कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहितीये… जय हिंद, जय महाराष्ट्र, जयभीम… चित्रा वाघ यांची पोस्ट चर्चेत

Chitra Wagh: जय हिंद, जय महाराष्ट्र, जयभीम... म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सडकून टिका, म्हणाल्या, 'कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहितीये...', चित्रा वाघ यांची पोस्ट सर्वत्र चर्चेत

कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहितीये... जय हिंद, जय महाराष्ट्र, जयभीम... चित्रा वाघ यांची पोस्ट चर्चेत
Chitra Wagh
| Updated on: Jan 27, 2026 | 1:56 PM

Chitra Wagh: कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहितीये… असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गायिता अंजली भारती हिच्यावर निशाणा साधत, कठोर कारवाईची मागणी केली आहे. सांगायचं झालं तर, गायिका अंजली वाघ हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे वातावरण तापलं आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशात चित्रा वाघ यांनी देखील अंजली भारती यांच्यावर संताप व्यक्त करत, अंजली भारती नावाच्या या बाईची बुद्धीची किव करावी तितकी कमी आहे… असं म्हणाल्या आहे.

एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत चित्रा वाघ म्हणाल्या, ‘अंजली भारती नावाच्या बाईचा आताच एक व्हिडीओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो… पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करा.. अशी चिथावणी देणं.. ती सुद्धा एका बाईने? अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी कमी आहे. अशी भाषा मानसीक विकृती असून या बाईवर आणि ज्याने कोणी हा कारर्यक्रम आयोजित केलाय त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे…’

 

 

पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, ‘श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून बकात्कारासारख्ये गुन्ह्याचं समर्थन करणं… त्या वक्तव्यावर टाळ्या, पैसे उधळणं जाणं आणि ते अभिव्यक्ती स्वतंत्र्य म्हणून मिरवणं हे समाजचं भयानक चित्र आहे. पण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं शस्त्र आमच्याकडे आहे. अशा सामाजीत किडीवर कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे… जय हिंद | जय महाराष्ट्र | जय भीम’

व्हिडीओ पोस्ट करत चित्रावाघ यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे? हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे. पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हाला माहितीये…. पोस्टवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.