CIDCO House Price: सिडकोची घरे स्वस्त, सरकारचा सर्वात मोठा निर्णय, शिंदेंनी थेट घोषणा करून टाकली!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत आता सिडकोची घरे स्वस्त करण्यात आली आहेत. या निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होणार आहे.

CIDCO House Price: सिडकोची घरे स्वस्त, सरकारचा सर्वात मोठा निर्णय, शिंदेंनी थेट घोषणा करून टाकली!
cidco home lottery price cut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 13, 2025 | 5:16 PM

CIDCO House Price Cut : प्रत्येकालाच स्वत:चं हक्काचं घर असावं असं वाटतं. त्यासाठी अनेकजण आयुष्यभर प्रयत्न करतात. मुंबईसारख्या मोठ्या शहरात तर आज घडीला घराच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे या शहारत स्वत:चे हक्काचे घर घेणे हे स्वप्नच राहिले आहे. सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सरकार म्हाडा आणि सिडकोतर्फे घरांची निर्मिती करते. या घरांच्या किमती बाजाराभावाच्या तुलनेत कमी असतात. परंतु म्हाडाच्या तुलनेत सिकडोची घरे खूपच महागडी आहेत. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही सिडकोने उभारलेली घरे घेता येत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन आता राज्य सरकारने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारने सिडकोच्या घरांची किंमत तब्बल 10 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होणार आहे.

नेमका काय निर्णय घेण्यात आला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (13 डिसेंबर) नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सिडकोच्या घरांची किंमत 10 टक्क्यांनी कमी करण्याची ऐतिहासिक घोषणा केली. या घोषणेनुसार आता सिडकोच्या घरांची किंमत 10 टक्क्यांनी कमी केली जाणार आहे. या निर्णयाचा फायदा आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) प्रवर्गातील नागरिकांना होणार आहे. या एका निर्णयामुळे तब्बल 17 हजार घरांच्या किमती कमी होणार आहेत. खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे, पनवेल या भागातील घरांच्या किमती कमी केल्या जातील.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री  शिंदे म्हणाले की सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या परिसरात तब्बल १७ हजार घरे बांधण्यात आली आहेत. या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. त्यापूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. इडब्ल्यूएस आणि एलआयजी या प्रवर्गातील घरांच्या किमती १० टक्के कमी होतील. दरम्यान शिंदे यांनी केलेल्या या घोषनेनंतर सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.