मोठी बातमी! लवकरच महालॉटरी, हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
कित्येक वर्षे प्रयत्न करूनही स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न काही पूर्ण होत नाही. आता मात्र हजारो कुटुंबांना मुंबई आणि उपनगरांत स्वस्तात घर मिळू शकते. कारण सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तशी माहिती समोर आली आहे. सरकारने घराच्या किमतीबात तोडगा काढल्यास घरांची लॉटरी काढण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असे सिडकोच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

CIDCO House Lottery : मुंबई आणि उपनगरांत घर घेणं हे हजारो लोकांचं स्वप्न असतं. या भागात घरांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न शेवटपर्यंत पूर्ण होत नाही. सरकारकडून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून स्वस्त घरे बांधली जातात. मात्र या काही हजार घरांसाठी लाखो अर्ज येतात. त्यामुळे कित्येक वर्षे प्रयत्न करूनही स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न काही पूर्ण होत नाही. आता मात्र हजारो कुटुंबांना मुंबई आणि उपनगरांत स्वस्तात घर मिळू शकते. कारण सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तशी माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
मिळालेल्या माहितीनुसार सिडकोडून नवी मुंबईत लवकरच जम्बो लॉटरी काढली जाणार आहे. तशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने लवकर निर्णय घेतल्यास सिकडो जम्बो लॉटरी काढण्याचा निर्णय घेऊ शकते. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व गोष्टी जुळून आल्यास सिडको प्रशासन लवकरच महालॉटरी जाहीर करण्याची शक्यता आहे.
सिडकोच्या अधिकाऱ्याने नेमके काय सांगितले?
सरकारने घराच्या किमतीबात तोडगा काढल्यास घरांची लॉटरी काढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. सिडकोमध्ये 25 लाखांपर्यंतचीही घरे आहेत. संबंधित घर कुठे आहे, यावरून त्या घराची किंमत ठरते. मात्र एक सांगतो की बाजारमूल्याच्या तुलनेत सिडकोच्या घरांची किंमत कमीच आहे. तसेच खासगी बिल्डरने बांधलेल्या इमारतींपेक्षाही सिडकोची घरे चांगली आहेत, अशी माहिती सिडकोच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
निर्णय नेमका कधी होणार?
त्यामुळे आता सिडकोच्या घरांची किंमत कमी करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून महालॉटरी निघण्याची शक्यता आहे. ही लॉटरी जाहीर झाल्यास हजारो लोकांना स्वस्तात हक्काचे घर मिळणार आहे. त्यामुळे या लॉटरीबाबतचा प्रत्यक्ष निर्णय कधी होणार? हे लवकरच समजण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
