AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सीआयडीची महत्त्वाची पत्रकार परिषद, तपासासंदर्भात मोठा खुलासा

अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं, दरम्यान या विमान अपघात प्रकरणात सध्या सीआयडी तपास करत आहे. आज या सर्व पार्श्वभूमीवर सीआयडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सीआयडीची महत्त्वाची पत्रकार परिषद, तपासासंदर्भात मोठा खुलासा
सीआयडीची पत्रकार परिषद Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 26, 2026 | 7:06 PM
Share

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला येण्यासाठी निघाले होते. परंतु विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला. विमान थेट जमिनिला धडकलं. जमिनिला धडकल्यानंतर विमानाला भीषण आग लागली, मोठी स्फोट झाला. या अपघाताबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने शंका उपस्थित करत आहेत. अजूनही या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर का दाखल करुन घेतला नाही? असा सवाल त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. यावेळी ते चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर सीआयडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली.

सध्या अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. दरम्यान आज पुण्यामध्ये सीआयडीची पत्रकार परिषद पार पडली. अजितदादांचा घातपात आहे का? हा तपासाचा उद्देश असल्याचं सीआयडीने यावेळी स्पष्ट केलं आहे. घातपात, निष्काळजीपणा आणि गुन्हेगारी कृत्याच्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही यावेळी सीआयडीने म्हटलं आहे .

अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास योग्य दिशेनं सुरु आहे. अतिशय प्रोफ्रेशनल पद्धतीनं सीआयडी तपास करत आहे. केंद्रातल्या अनेक संस्था तपासात सहकार्य करत आहेत. एएआयबीशी सीआयडीचा सातत्यानं समन्वय सुरू आहे. एएआयबीचा तपास संपल्यानंतर त्यांच्या अहवालाचा निष्कर्ष सीआयडी तपासादरम्यान लक्षात घेणार आहे. महाराष्ट्र सरकारनं तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. जर घातपात, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कृत्य निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करेल, अशी माहिती यावेळी सीआयडीकडून देण्यात आली.

दरम्यान  VSR कंपनीवर DGCA कडून कारवाई झाली आहे, तुमच्या तपासात या कंपनीकडून हलगर्जीपणा झाल्याचं आढळून आल आहे का? असा सवालही यावेळी करण्यात आला. याला उत्तर देताना सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की,  तांत्रिक तपास हा वेगळा भाग आहे आणि आमचा सीआयडीचा तपास हा आकस्मिक मृत्यूबद्दल आहे.  आमच्या तपासात काही पुरावे मिळाले आहेत.  AAIB चा अहवाल आला की तो आमच्या तपासात समाविष्ट केला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...