AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतिहास घडला, अखेर तेजस ठाकरे मैदानात; आदित्य ठाकरेंसोबत ठिय्या, मुंबईच्या आंदोलनाला नवी धार

मुंबईतील शिवाजी पार्कात आज मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी निघालेल्या पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. नेमकं काय घडतंय?

इतिहास घडला, अखेर तेजस ठाकरे मैदानात; आदित्य ठाकरेंसोबत ठिय्या, मुंबईच्या आंदोलनाला नवी धार
Tejas Thakceray aditya thakceray at sena bhavanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 6:33 PM
Share

सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आता मुंबईत वातावरण गरम झालं आहे. शिवाजी पार्कात पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु होती. यावेळी पोलिस शिवसेना भवन परिसरात गेले. तिथे कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये मोठा गोंधळ झालेला पाहयला मिळालाय. यावेळी सर्व परिस्थिती पाहता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे दाखल झाले. त्यांनी पोलिस व्हॅनवर चढत या पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदवला. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ तेजस ठाकरेही मैदानात उतरले आहेत. त्यांनी यावेळी ठाकरेंच्यावतीने मैदानात झेप घेतली आहे.

मुंबईत नेमकं काय घडतंय?

शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीने आज आंदोलनाची हाक दिली आहे. त्यापार्श्वभूमिवर मैदानात कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. पण पोलिसांनी याठिकाणी मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवाजी पार्क परिसरात फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी सुरु केली. त्यामुळे शेकडो कार्यकर्त्याना अडवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी अमित ठाकरेंनाही पोलिसांनी अडवलं. त्याचवेळी आंदोलकांची धरपकड करताना सेना भवन परिसरातही पोलिस घुसले. हे पाहून आता आदित्य ठाकरे हेदेखील तिथं दाखल झाले आहेत. दरम्यान, आता याघडली मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सीजेपीचे कार्यकर्ते, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असे सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. त्यांनी सर्वांनी मिळून पोलिस कारवाईविरुद्ध, निवडणूक आयोगाविरुद्ध आणि ज्ञानेश कुमार, भाजपविरोधात घोषणाबाजी केली आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या अंगात दिल्लीचं भूत घुसलं आहे. पण आम्ही मागे हटणार नाही. ज्या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना सोडा. आम्ही रोज आंदोलन करणार. शिवाजी पार्कात रोज आंदोलन होणार, अमित ठाकरेंना ताब्यात घेण्यात आलं आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. अख्ख्या महाराष्ट्रात हे आंदोलन तुम्हाला पाहायला मिळेल, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या कथित मतचोरी प्रकरणावरुन त्यांचा राजीनामा मागण्यासाठी हे सर्व आंदोलनं सुरु आहेत.

मुंबईत वणवा पेटला आहे. प्रत्येक नागरिक आपल्या हक्कासाठी लढताना दिसतो आहे, असं यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. वरुण सरदेसाई यांनीही सेना भवन परिसरात हजेरी लावली आहे. अनेक मोठे नेते आता शिवाजी पार्कच्या दिशेने निघाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईत वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ