गडचिरोलीत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, धुमश्चक्रीत तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान, 3 जवान जखमी

नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.

गडचिरोलीत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, धुमश्चक्रीत तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान, 3 जवान जखमी
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 8:24 PM

गडचिरोली: नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आलेय. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

आज (13 नोव्हेंबर) सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. या नक्षलवाद्यांनी छत्तीसगड भागातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तीन जवानांना उपचारासाठी नागपुरात हलविले 

मोहिमेमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. यात पोलिसांचे तीन जवान गंभीर जखमी झाले. जखमी पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अजूनही पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असून मोठ्या संख्येत पोलीस तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत.

16 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यास बेड्या

दरम्यान, याच वर्षी एप्रिल महिन्यात पोलिसांना नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश आले होते. खून, चकमक तसेच जाळपोळीसारखे गंभीर आरोप असलेल्या तसेच 16 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या नक्षलवाद्याला पोलिसांनी पकडलं होतं. खोब्रामेंढा येथे झालेल्या सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला होता. याच चकमकीत हा नक्षलवादी जखमी झाला होता. किशोर कावडो असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव होते.

इतर बातम्या :

Video : आधी मुख्यमंत्र्यांवर टीका, मग सोमय्यांना ‘त्या’ वक्तव्याची उपरती!

मोठी बातमी! मणिपूरच्या अतिरेकी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यासह 5 जवान शहीद, पत्नी आणि मुलाचाही मृत्यू

Video | जाळपोळ, दगडफेकीनंतर अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण, चार जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवली

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.