Video : आधी मुख्यमंत्र्यांवर टीका, मग सोमय्यांना ‘त्या’ वक्तव्याची उपरती!

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली होती. मात्र, त्यानंतर सोमय्यांना आपण केलेल्या त्या वक्तव्यावर उपरती झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थनाही केली.

Video : आधी मुख्यमंत्र्यांवर टीका, मग सोमय्यांना 'त्या' वक्तव्याची उपरती!
किरीट सोमय्या, भाजप नेते
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 4:33 PM

बुलडाणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील एच.एन. रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशावेळी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली होती. मात्र, त्यानंतर सोमय्यांना आपण केलेल्या त्या वक्तव्यावर उपरती झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थनाही केली. (Criticism of CM Uddhav Thackeray from Kirit Somaiya, then prayers for his health)

किरीट सोमय्या काय म्हणाले होते?

कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजण्यात व्यस्त होते. तर बायकोचा बंगला वाचवण्यात व्यस्त होते. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला वाचवण्यात व्यस्त होते. अनिल परब यांच्या बांधकामात व्यस्त होते, अशा अनेक कामात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यक्त होते, अशी खोचक टीका सोमय्या यांनी केलीय. ठाकरे सरकारने लुटीच्या साम्राज्याची स्थिती उभी केलीय. तर अजित पावरांचे मेहुणे आणि मामाला ईडीचे निमंत्रण आलं असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.

येत्या 31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकारमधील 40 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. तर अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत त्यांचे मामा आणि मेहुणे यांना ईडीचे निमंत्रण आले आहे. येत्या 31 डिसेंबर पर्यंत ठाकरे सरकार मधील 40 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प आमचा आहे, असा इशाराही सोमय्या यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेबाबत उपरती

किरीट सोमय्या यांनी बुलडाण्यात बोलताना मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यानंतर संध्याकाळी पत्रकारांनी सोमय्या यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांवर आपण कुठलीही टीका केली नाही. उलट मुख्यमंत्र्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करतो. नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, असं सोमय्या म्हणाले.

सोमय्यांकडून बुलडाणा अर्बन बँकेला क्लीन चिट?

सार्वजनिक बामधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील 4 साखर कारखान्यांना कर्ज दिल्या प्रकरणी आयकर विभागाने बुलडाणा अर्बन बँकेवर धाड टाकून खळबळ उडवून दिलीय होती. बँकेतील 1200 खाती बनावट असल्याचे सांगून 54 कोटी रुपयांचा हिशेब लागत नसल्याचं सांगत, ती खाती होल्ड ठेवली आहेत, असा आरोप करत सोमय्या आज बुलडाण्यात आले होते. सोमय्या यांनी बँकेत जाऊन अध्यक्ष राधेशाम चांडक यांची भेट घेत सर्व माहिती घेतली. तसंच बँक आयकर विभागालाही सहकार्य करेल असं बँकेकडून सांगण्यात आल्याचं सोमय्या म्हणाले.

इतर बातम्या :

आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात, वणवा दिल्लीत पोहोचणार, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा

Video | जाळपोळ, दगडफेकीनंतर अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण, चार जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवली

Criticism of CM Uddhav Thackeray from Kirit Somaiya, then prayers for his health

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.