AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 29.53 टक्के

इयत्ता दहावीचा जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल 29.53 टक्के लागला आहे. 51 हजार 313 विद्यार्थ्यांनी जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षा दिली होती. 15 हजार 157 विद्यार्थी उत्तीर्ण उत्तीर्ण झाले आहे.

इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 29.53 टक्के
| Updated on: Jul 14, 2026 | 5:38 PM
Share

इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यंदा राज्यभरात एकूण 29.53 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला 51 हजार 313 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 15 हजार 157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागनिहाय निकालात नाशिक विभाग 41.45 टक्क्यांसह अव्वल, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 34.27 टक्के लागला आहे. निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीही ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी यांनी दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षाचे निकाल जाहीर केले आहे.   गेल्या वर्षी १० च्या पुरवणी परीक्षेचा निकाल 36.48टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालात 6.96 टक्क्यांनी घट झाली आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी 53 हजार 880 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात 37 हजार 924 मुले, 14  हजार 956 मुली होत्या. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 10हजार 224  मुले, 4 हजार 933 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 34.6 टक्के मुली, तर 27.75 टक्के मुले उत्तीर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत 18 हजार 482  विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत उत्तीर्ण होऊ न झाल्याने ते एटीकेटीसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष  2026-27 मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे अकरावीला प्रवेश घेता येईल असे पत्रकात म्हटले आहे.

इयत्ता 10 वी पुरवणी परीक्षा – जून-जुलै 2026

निकाल जाहीर : 14 जुलै 2026

– नोंदणी : 52 हजार 880

– परीक्षेला बसले : 51 हजार 313

– उत्तीर्ण : 15 हजार 157

– राज्याचा निकाल : 29.53%

विभागनिहाय निकाल

– नाशिक – 41.45%

– नागपूर – 39.42%

– लातूर – 34.55%

– छत्रपती संभाजीनगर – 34.27%

– अमरावती – 30.36%

– पुणे – 23.99%

– कोल्हापूर – 18.53%

– मुंबई – 17.73%

– कोकण – 12.26%

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक