AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळवर पुन्हा महाभयंकर संकट! कधीही फुटू शकतं सरोवर; चीनचा थेट इशारा

नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या महापुरानंतर लेंडे नदीवरील नव्याने तयार झालेले हिमनदी सरोवर कधीही फुटू शकते, असा इशारा चीनने दिला आहे. सरोवरातील पाण्याचा रंग गडद होत असून, ते वेगाने वाढत आहे. या स्फोटामुळे प्रति सेकंद 500 घनमीटर पाणी वाहून मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

नेपाळवर पुन्हा महाभयंकर संकट! कधीही फुटू शकतं सरोवर; चीनचा थेट इशारा
Nepal Lake BurstImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2026 | 12:18 PM
Share

नेपाळमध्ये चार दिवसांपूर्वी आलेल्या महापुरानंतर देशावरचं संकट अजून काही टळलेलं नाही. नेपाळवर अजून एक संकट घोंघावत आहे. लेंडे नदीच्या वरच्या भागातील सरोवर कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे, असा इशाराच चीनने नेपाळला दिला आहे. या सरोवरातील पाणी सातत्याने गडद होत आहे. हा धोक्याचा इशारा मानला जात आहे. सरोवर फुटल्यानंतर नदी में पाण्याचे लोट 500 घन मीटर प्रति सेकंद वाहू शकते, असा इशाराही चीनने दिला आहे. त्यामुळे नेपाळचं टेन्शन वाढलं आहे.

मीडिया रिपोर्ट्स नुसार, चीनने ही माहिती सर्वात आधी नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाशी शेअर केली आहे. पाण्याचा रंग सातत्याने गडद होत आहे. हा धोक्याचा इशारा आहे. याचा अर्थ सरोवर कधीही फुटण्याचे संकेत मिळत आहे, असं चीनने नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाला दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.

या आठवड्यात नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडनंतर हे सरोवर तयार झालं आहे. ग्लेशियर तुटल्याने मोठा ढिगारा खाली आला. या प्रचंड ढिगाळ्यामुळे नदीचा मार्ग बंद झाला. त्यामुळे एक नैसर्गिक बांध तयार झाला. त्याच्या मागे पाणी जमा होऊ लागल्याने मोठं सरोवर तयार झालं.

दोन नद्यांच्या संगमावर…

हे सरोवर चीनच्या जवळ चोचेन नदी आणि नेपाळच्या दिनेशने पुरेपू नदीच्या संगमावर बनलं आहे. चीनच्या जलसंसाधन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरोवरात पाण्याचा स्तर सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी यात आतापर्यंत सुमारे 25 लाख घन मीटर पाणी जमा झालं आहे. धोका पाहता चीनने खालच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच ड्रोन आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जात आहे.

सरोवर फुटल्यास…

एका रिपोर्ट नुसार, सरोवर फुटल्यानंतर किती परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी चीनने एक मॉडल तयार केलं आहे. आकलनानुसार, अशा परिस्थितीत नदीच्या पात्रातून पाण्याचा कमाल प्रवाह प्रति सेकंद 500 घनमीटरपर्यंत पोहोचू शकतो. जर नैसर्गिक बांधचा काही भाग जरी फुटला तरी पाणी नदीच्या किनाऱ्याच्या आतच राहील. म्हणजेच अचानक पाणी वाढू शकतं. पण नदीच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू शकत नाही, असंही चीनचं एक आकलन आहे.

चीनच्या मते, शुक्रवारी सरोवराचं पाणी लेंडे खोला आणि त्रिशूली नदीमधून वाहण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत निर्माण झालेला धोका हाताळण्यासारखा होता असं मानलं गेलं. तरीही नेपाळची चिंचा वाढलेली आहे. बुधवारी झालेल्या महापुरात आतापर्यंत 626 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तिबेटमध्ये सात लोक दगावल्याची पुष्टी झाली आहे.

Follow Us
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर