AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुर्ला बेस्ट बस अपघातातील ‘तो’ चालक दारु प्यायला होता का? देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले “तो…”

आमदार सुनील शिंदे यांनी सरकारला कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

कुर्ला बेस्ट बस अपघातातील 'तो' चालक दारु प्यायला होता का? देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले तो...
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Dec 16, 2024 | 4:36 PM
Share

Devendra Fadnavis On Kurla Bus Accidnet : गेल्या आठवड्यात मुंबई बेस्ट बस अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. सोमवारी मुंबईतील कुर्ला पश्चिमेकडे बेस्ट बसचा भीषण अपघात घडला. या अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 45 जण जखमी झाले. यातील जखमींवर मुंबईतील भाभा रुग्णालय, सायन रुग्णालय आणि आणखी इतर काही रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते. मात्र या घटेनमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. या घटनेनंतर बेस्ट बसने प्रवास करायचा की नाही, असा प्रश्न अनेक लोक उपस्थित करत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. नागपुरात १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. त्यातच आता सभागृहात विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यांवर घेरायला सुरुवात केली. त्यातच आता आमदार सुनील शिंदे यांनी सरकारला कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

चालकाने दारु न पिता गाडी चालवली

“बेस्ट अपघाताची घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. यावर आम्ही सविस्तर निवेदन करु. याबद्दल उपाययोजनाही आम्ही केलेल्या आहेत. बेस्ट बस अपघाताप्रकरणी चालकाची ड्रिंक अँड ड्राईव्हबद्दलची चाचणी केलेली आहे. त्यात त्या चालकाने दारु न पिता गाडी चालवली असल्याचे आढळले आहे. तरी देखील आपण त्या चालकाचे काही वेगळ्या चाचण्या करत आहोत. तसेच त्याचा तपासही सुरु आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हटले.

नवीन बस लवकरच ताफ्यात जमा होणार

“यासोबत देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल कोणत्या उपाययोजना करणार, यावरही भाष्य केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना १३०० बस विकत घेण्याचा निर्णय झाला. त्या लवकरच ताफ्यात जमा होणार आहेत. बेस्टच्या अनेक बसेस खूप जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे नवीन बसेस खरेदी करण्यासाठी १३०० बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. या अपघाताप्रकरणी आयुक्तांना निर्देश दिले आहेत की बेस्टचे जे कोणी प्रमुख आहेत, त्यांच्यासोबत बसून एक योग्य प्लॅन बनवा, जेणेकरुन बेस्टच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपल्याला योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील”, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.