AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला मिळणार?, तुम्ही पात्र आहात का?; जाणून घ्या पटापट

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यंमंत्र्यांनी 'लाडका भाऊ' योजना जाहीर केली . या योजनेअंतर्गत १२ वी पास झालेल्या तरूणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली

लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला मिळणार?, तुम्ही पात्र आहात का?; जाणून घ्या पटापट
मुख्यमंत्र्यांनी केली लाडका भाऊ योजनेची घोषणा
| Updated on: Jul 17, 2024 | 11:44 AM
Share

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यंमंत्र्यांनी ‘लाडका भाऊ’ योजना जाहीर केली . या योजनेअंतर्गत १२ वी पास झालेल्या तरूणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्याअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. बहि‍णींसाठी योजना, मग लाडक्या भावांसाठी काय, असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला होता. मात्र आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठीदेखील योजना आणली आहे.

लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला मिळणार ?

जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील. यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बँक खाते  हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे.

लाडका भाऊ योजना साठी पात्रता काय ​?

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 चा लाभ घेण्यासाठी, राज्य सरकारने विहित केलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.

शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असावी.

या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील.

अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 चे फायदे आणि वैशिष्ट्ये

लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगारासाठी तयार केले जाणार.

या योजनेंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा १० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे .

प्रशिक्षणादरम्यान, राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, आयटीआयला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहे.

ही योजना राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला ६ महिन्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ देईल.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पगाराचा लाभ मिळू लागेल.

महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी 10 लाख तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

राज्यातील अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार 6,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत रक्कम तरुणांना वैयक्तिक गरजांसाठी वापरण्यास सक्षम करेल.

या आर्थिक मदतीची रक्कम विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदी करण्यास मदत करेल.

मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास युवक कोणताही रोजगार सहज सुरू करू शकतील.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना