AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरुनही पैसे आले नाहीत, एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले “त्यांना पैसे…”

काही महिलांनी अर्ज केल्यानंतरही त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या महिला नाराज झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल नवीन अपडेट दिली आहे.

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरुनही पैसे आले नाहीत, एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले त्यांना पैसे…
| Updated on: Nov 08, 2024 | 2:10 PM
Share

CM Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत सरकारकडून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. ही योजना जून महिन्याच्या अखेरपासून सुरु झाली. या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केले होते. यातील बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. तर काही महिलांनी अर्ज केल्यानंतरही त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या महिला नाराज झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल नवीन अपडेट दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. नुकतीच एकनाथ शिंदे यांची सोलापुरात एक प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत त्यांनी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप आलेले नाहीत, त्यांना ते पैसे कधी मिळणार याबद्दल भाष्य केले.

आचारसंहिता संपल्यावर पैसे खात्यात जमा होणार

“लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे. या योजनेने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. आता त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. आता महिलांचा सन्मान करा, असं माझं सगळ्या भावजींना सांगणं आहे. पूर्वी काही खरेदी करायची असेल तर बहिणींना घरात हात पुढे करावा लागत होता. मात्र आता तशी परिस्थिती नाही. तसेच ज्या बहिणींच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत, त्यांना मी वंचित ठेवणार नाही. लवकरच त्यांच्याही खात्यात पैसे येणार. नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचे पैसे खात्यात जमा केले जातील”, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

“विरोधकांनी या योजनेत खोडा घातला”

“माझ्याकडे अधिकार आल्यावर मी संकल्प केला होता की माझ्या बहिणींना, भावांना, शेतकरी यांना काहीतरी देईल. त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन लाडकी बहीण योजना सुरु केली. त्याविरोधात काँग्रेसचे लोक कोर्टात गेले. मात्र कोर्टाने त्यांच्या कानशिलात लागावली. एकीकडे विरोधकांनी या योजनेत खोडा घातला. मात्र दुसरीकडे त्यांनी महालक्ष्मी योजना आणणार असल्याचे सांगितले. काही लोक आम्हाला 46000 कोटी कुठून आणणार असं विचारत होते. मग त्यांच्या योजनेला 93000 कोटी रक्कम कुठून आणणार? काँग्रेसने कर्नाटक, हिमाचल प्रदेश मध्ये लोकांना फसवले”, असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.

“मी शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार”

“पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते, आताचे सरकार मात्र बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे आहे. विरोधक सांगतात की सरकार आल्यावर योजनांची चौकशी करणार. अरे मी एकनाथ शिंदे आहे कसल्या पोकळ धमक्या देतात. मी संघर्ष करून येथे आलेलो आहे. तुमच्यासारखा घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. माझ्या लाडक्या बहि‍णींसाठी मी शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. पण माझ्या लाडक्या बहिणी त्यांचे सरकार येऊ देणार नाही याचा विश्वास मला आहे”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले