Maharashtra Budget 2026-27 : महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र करणार – अर्थसंकल्पातून मुख्यमंत्र्याच्या महत्वाच्या घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-2027 चा महाराष्ट्र अर्थसंकल्प सादर केला. यात राज्याला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे. 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' व्यासपीठाद्वारे लाखो रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले. महिला शेतकरी योजना, ग्रामीण रस्ते विकास आणि अजित पवारांच्या कार्याला साजेशा स्मारकाची घोषणा प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हे बजेट राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देणारे आहे.

Maharashtra Budget 2026-27 : महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र करणार - अर्थसंकल्पातून मुख्यमंत्र्याच्या  महत्वाच्या घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
| Updated on: Mar 06, 2026 | 2:37 PM

राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज राज्याचं बजेट सादर करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पाची जबाबादरी खांद्यावर घेतली आणि त्यांनीच आज पहिल्यांदा 2026-2027 सालचा राज्याच अर्थसंकल्प सादर केला. छत्रपती शिवाजी महाराज, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून त्यांनी बजेट वाचनास सुरूवात केली. मात्र अजित दादांच्या आठवणीने त्यांचा आवाज जड झाला होता.

या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या असून महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा व्यासपीठ तयार करत आहोत असं सांगत लाखो रोजगार निर्माण होईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. यावेळी त्यांनी अजित पवार यांची आठवण काढत त्यांच्या कार्याचा गौरव करत दोन मोठ्या घोषणाही केल्या. अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे एक भव्य स्मारक राज्य सरकारतर्फे उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा काय ?

महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र करणार

– संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे. 1 कोटींची मुख्यमंत्री मत्स्य योजना करण्यात येत आहे.

– मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एक अंतर्गत ३० हजार किलोमीटर पर्यंत कामे झाली आहे. उर्वरीत कामे मार्च अखेरीपर्यंत होत आहे. तीन टप्पे घोषित करत आहोत. 23 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांचे कामे करण्यात येणार आहे.

– 123 अब्ज डॉलरवरून 1500 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे उद्देश आहे. हाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचा उद्देश आहे.

– राज्याचे नवीन गुंतवणूक व औद्योगिक सेवा धोरण जाहीर. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंघ डिजीटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. या धोरणातून ५० लाख रोजगार निर्माण होणार आहे. तसेच यासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

– आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात करणार. गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचा ही समावेश करणार.

 

Follow Us