AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्याच्या महापौरांचा एक व्हॉट्सअ‍ॅप, मुख्यमंत्र्यांकडून 24 मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था

म्हस्केंच्या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तासाभरात दहा मेट्रिक टन ऑक्सिजन ठाणे शहराकडे रवाना केला.(Uddhav Thackeray Oxygen Naresh Mhaske )

ठाण्याच्या महापौरांचा एक व्हॉट्सअ‍ॅप, मुख्यमंत्र्यांकडून 24 मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Apr 12, 2021 | 7:32 AM
Share

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या कार्यतत्परतेची प्रचिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (Thane Mayor Naresh Mhaske) यांना नुकतीच आली. नरेश म्हस्केंनी व्हॉट्सॲपवरुन उद्धव ठाकरेंना ऑक्सिजनच्या तुटवड्याविषयी माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत 24 मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. (CM Uddhav Thackeray arranges Oxygen within hours after Thane Mayor Naresh Mhaske requests on WhatsApp)

राज्यभरात कोव्हिड रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा सहन करावा लागत असतानाच ठाण्यातही हीच परिस्थिती उद्भवली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन पुरवठा करण्याची विनंती केली.

तासाभरात दहा मेट्रिक टन रवाना

म्हस्के यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तासाभरात दहा मेट्रिक टन ऑक्सिजन ठाणे शहराकडे रवाना केला. यासोबतच पुढील काही तासांत उर्वरित 14 मेट्रिक टन ऑक्सिजनही ठाणे शहरात पाठवला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी संध्याकाळी राज्याच्या टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. बैठकीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा, लॉकडाऊन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. (CM Uddhav Thackeray arranges Oxygen within hours after Thane Mayor Naresh Mhaske requests on WhatsApp )

बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा?

बैठकीत ऑक्सिजन कसं वाढवता येईल, याबाबत चर्चा झाली. या बैठकीत ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट करण्याबाबत चर्चा झाली. ही सुविधा थोडी खर्चिक आहे. पण याबाबत नक्की प्रयोग करु, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

लिक्वीड ऑक्सिजन प्लॅन्ट

लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्टबाबत चर्चा झाली. हे प्लॅन्ट जिथे जिथे आहेत तिथे आपण सिलेंडर भरुन आणतो. त्या सिलेंडरला ट्यूबच्या माध्यमातून रुग्णांना देतो. मात्र, आता ज्या पद्धतीने या प्लॅन्टची संख्या आहे त्यानुसार ही पद्धत बंद करावी, हा मुद्दा चर्चेत मांडला. लिक्वीड ऑक्सिजन प्लॅन्ट प्रत्येक जिल्ह्यात टाकायचा, असा निर्णय घेण्यात आला.

हा प्लॅन्ट टाकल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांसाठी ऑक्सिजन साठवता येऊ शकतं. त्यामुळे दररोजची पळापळ होणार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने बैठक घेणार आहेत.

संबंधित बातम्या :

आधी अर्थ विभागाशी, कॅबिनेट बैठकीत चर्चा, नंतर मुख्यमंत्री 14 एप्रिलला लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करणार : राजेश टोपे

लॉकडाऊन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन ते ऑक्सिजनचा पुरवठा, टास्क फोर्सच्या बैठकीत पाच महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा

(CM Uddhav Thackeray arranges Oxygen within hours after Thane Mayor Naresh Mhaske requests on WhatsApp)

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.