AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नकोच! 15 जूनपर्यंत राज्यात मॉन्सूनची शक्यता कमीच, प्रशासनाने..

मॉन्सून राज्यात दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यानच सीएमओ कार्यालयाने याबाबत मोठी अपडेट दिली. 15 जूनपर्यंत आपल्याला मॉन्सूनच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. शेतकरी सध्या मॉन्सूनच्या पावसाची वाट पाहत आहेत.

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नकोच! 15 जूनपर्यंत राज्यात मॉन्सूनची शक्यता कमीच, प्रशासनाने..
Monsoon rain
| Updated on: Jun 08, 2026 | 10:11 AM
Share

महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात मॉन्सून जरी दाखल झाला असला तरीही मॉन्सूनच्या पावसाकरिता वाट पाहावी लागणार आहे. राज्यात जो पाऊस सुरू आहे, तो अवकाळी पाऊस आहे. मॉन्सूनच्या पावसाला अद्याप सुरूवात झाली नाही. यादरम्यानच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून मॉन्सूनबाबत मोठी माहिती देण्यात आली. किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगण्यात आले. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे.

त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, अशी पोस्ट मुख्यमंत्री कार्यालयाकडून शेअर करण्यात आली.  15 जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती आता थेट सीएमओ कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मॉन्सूनचा वेग मंदावल्याचे बघायला मिळतंय. 15 जूनपर्यंत आता मॉन्सूनच्या पावसाकरिता वाट बघावी लागणार आहे. शेतकरी पेरणीकरिता मॉन्सूनच्या पावसाची वाट बघत आहेत. मात्र, आता पाऊस लांबणीवर पडल्याचे बघायला मिळत आहे. काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. कृषी विभागाकडून अगोदरच सांगण्यात आले की, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. केरळमध्ये यंदा दोन दिवस उशिराने मॉन्सून दाखव झाला. त्यानंतर आता त्याचा वेल मंदावत आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात