AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gaurav Khanna- Akanksha Chamola : त्यापेक्षा माझा कुत्रा आला असता तर.. त्या वक्तव्यानंतर आकांक्षा चमोला ट्रोल

'लॉकअप 2' या शोमधील स्पर्धक आकांक्षा चमोला धक्कदायक खुलासे, विधानं करत असते. पण तिने नुकत्याचा केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडिया युजर्स चांगलेच तापले आहेत. असं काय बोलून गेली आकांक्षा ?

Gaurav Khanna- Akanksha Chamola : त्यापेक्षा माझा कुत्रा आला असता तर.. त्या वक्तव्यानंतर आकांक्षा चमोला ट्रोल
आकांक्षा चमोला - गौरव खन्ना
| Updated on: Jul 24, 2026 | 4:00 PM
Share

नेटफ्लिक्सवरील ‘लॉकअप 2’ हा शो दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालला आहे. या शोमध्ये सहभागी झालेले सेलिब्रिटी, स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत नवे खुलासे करत असतात. राम कपूर, सुनिता अहुजा, शिवांगी जोशी, यांच्यासोबतच या शोमध्ये टीव्ही अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोलानेही सहभाग घेतला असून अगदी पहिल्या दिवसापासूनच चर्चेत कसं रहायचं ते तिला चांगलंच कळलं आहे. आल्या आल्या तिने गैौरव आणि तिच्या घटस्फोटाबद्दल घोषणा करत ब़ॉम्ब फोडला, मग आपण बायसेक्शुअल असल्याचा मोठा खुलासा तिने केला. या शोमध्ये आल्यापासूनच ती दररोज असे काहीतरी बोलते किंवा करते, ज्यामुळे ती सतत चर्चेचा विषय ठरते. मात्र, यावेळी मात्र आकांक्षाला तिचं विधानचागलंत महागात पजलं असून, सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. लोकं तिच्यावर एवढी टीका का करत आहेत, असं ती बोलली तरी काय ?

पती गौरवबद्दल काय म्हणाली आकांक्षा ?

खरंतर 23 जुलै रोजी ‘लॉकअप 2’मध्ये व्हिजिटर्स डे साजरा करण्यात आला. या दिवशी या शोमधील स्पर्धक धीरज धूपर याची पत्नी विन्नी अरोरा त्याला भेटण्यासाठी आली होती. दोघांसाठीही हा क्षण अत्यंत भावनिक होता. पत्नीला पाहताच धीरजला अश्रू अनावर झाले. थोड्या वेळाने विन्नी निघून गेल्यानंतर श्रेया कालरा, आकांक्षा चमोला आणि शिल्पा शिंदे एकत्र बसून गप्पा मारत होत्या. “तुझ्याही घरचं कोणी तरी आलं. धीरजची पत्नीही आली. आता मला माझा बॉयफ्रेंड हवा.” असं त्यावेळी श्रेया आकांक्षाला म्हणाली.

आकांक्षाचं हैराण करणारं विधान

मात्र त्यावर आकांक्षाने जे विधान केलं त्याने बरेच जण हैराण झाले. ती म्हणाली, “माझ्यासाठी तर तो एक्ससारखाच होता. ते पाहून वरुणही हसत होता, तो म्हणाला की, ‘तुझ्या कुटुंबातील कोण आलं? तुझ्याकडे तर तुझा एक्स ( पूर्व पती)आला.’ असं ती म्हणाली. “खरंच, त्यापेक्षा माझ्या कुटुंबातील कोणी आलं असतं तर बरं झालं असतं. मला माझा कम्फर्ट हवा होता. हे माझ्यापेक्षा त्याच्यासाठी जास्त होतं. माझे आई-वडील आले असते तर मला जास्त आनंद झाला असता. किंवा माझा कुत्रा आला असता तरी चाललं असतं.” अशा शब्दांत आकांक्षाने पती गौरव आल्याबद्दल निराशा व्यक्त केली.

मात्र तिच्या या विधानामुळे अनेकांचा संताप झाला. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आकांक्षावर टीका केली. “ही महिला अजिबात कृतज्ञ नाही.” असं एका युजरने लिहिलं. “ही असं बोलतेय जणू गौरवने तिला कधी प्रेमच दिलं नाही.” अशाशब्दांत दुसऱ्या युजरने टीकास्त्र सोडलं. आकांक्षाच्या बोलण्यानंतर काहींनी गौरवबद्दल सहानुभूती व्यक्त केली. “त्याच्यासाठी वाईट वाटतं. आकांक्षा आपल्या पतीचा अजिबात आदर करत नाही.” असं काहींनी म्हटलं, “कॅमेऱ्यासमोर पतीचा अशा प्रकारे अपमान करणे योग्य नाही.” अशीही कमेंट काही युजर्सनी लिहीली.

Follow Us
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा