AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर घेणारच पण पंतप्रधान यांचा राजीनामा घेऊन हे आंदोलन थांबेल, असीम सरोदे यांचे विधान..

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. सरकारकडून पेपरफुटीसंदर्भात विधेयक आणला जातोय. कॅबिनेटमध्ये त्याकरिता मंजुरी मिळाली. संसदेत हा विधेयक ठेवला जाईल. यादरम्यानच गंभीर आरोप करण्यात आलीत.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर घेणारच पण पंतप्रधान यांचा राजीनामा घेऊन हे आंदोलन थांबेल, असीम सरोदे यांचे विधान..
Dharmendra Pradhan and Narendra Modi
| Updated on: Jul 24, 2026 | 3:58 PM
Share

जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामध्येच घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यादरम्यान वकील असीम सरोदे यांनी पोलिस अत्याचार आणि आंदोलन यावर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटले की, मागे महात्मा गांधी आणि आंबेडकर यांचा फोटो ठेवला आहे. अभिजित दिपके पुण्यात आला, त्यावेळेस हा फोटो देण्यात आला होता. हाच फोटो दिल्लीत आंदोलनात ठेवला गेलाय. पेपर फुटी घोटाळा देशभर नव्हे जागतिक पातळीवर चर्चेचा विषय झालाय. शिक्षण व्यवस्था मूलभूत रित्या बदलली पाहिजे. पोलिसांच्या माध्यमातून अत्याचार केला जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची गरज आहे.

शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अत्याचार आणि लाठीचार्ज केल्यास आम्ही पोलीस यांच्यावर केसेस करू, असा मोठा इशारा त्यांनी दिला. कायदा सुव्यवस्था पाळताना मानवी हक्काचे पालन करणं गरजेचे आहे. कायदा तत्व हे पोलिसांना समजलं आहे का हे मुरलीधर मोहोळ यांनी विचारावे.पोलीस यांना मानवी हक्क हा विषय शिकवीला जायचा.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. पोलीस यांनी न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करू नये, आंदोलन पाहणाऱ्या लोकांना देखील मारहाण करण्यात आलीय. पोलिसांनी सौम्य बळाचाचं वापर करण्याचा अधिकार आहे. पोलिसांवर आम्ही तक्रार करू शकतो, अशी कायद्यात तरतूद आहे. पोलिसासंदर्भात महिला आयोग, मानवी हक्क आणि बालहक्क आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले.

मुले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर घेणारच परंतु पंतप्रधान यांचा राजीनामा घेऊन हे आंदोलन थांबेल, असे मोठे विधान वकील असीम सरोदे यांनी केले. पेपरफुटीच्या मुद्द्यावर कठोर कायदा केला जाणार आहे. याकरिता कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली. आता लवकरच संसदेत याबाबत विधेयक सरकारकडून सादर केले जाईल.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच