AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सागरी किनारपट्टी असलेल्या राज्याची परिषद मच्छीमारांसाठी ३ मोठ्या मागण्या, काय म्हणाले नितेश राणे

आमच्या मुलांना मुघलांचा इतिहास आणि प्रेम काँग्रेसमुळे दाखवले जात होते आता ते थांबेल असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

सागरी किनारपट्टी असलेल्या राज्याची परिषद मच्छीमारांसाठी ३ मोठ्या मागण्या, काय म्हणाले नितेश राणे
| Updated on: Apr 28, 2025 | 3:46 PM
Share

सागरी किनारपट्टी असलेल्या सर्व राज्यांची एक समिट पार पडली आहे. महाराष्ट्र सरकार आणि मस्त्य व्यवसाय खात्याने या कार्यक्रमाचे यजमान पद भूषविले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि भारत सरकारकडे मस्त्य व्यवसाय मंत्री म्हणून काही मागण्या केल्या आहेत. एलईडी फिशिंग संदर्भात जे नियम आहेत, ते आणखीन कडक करण्यात यावेत, महाराष्ट्र किनारपट्टीवरील एलईडी फिशिंग पूर्णपणे बंद करावी. किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमार समाजावर सीआरझेडची टांगती तलवार असते. त्यांना सातत्याने नोटीस दिली जात असते. याबद्दल केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेप्रमाणे प्रत्येक मच्छीमाराचे घर सीआरझेडचे नियम शिथील करून अधिकृत करण्याची योजना आणावी अशी मागणी मस्त्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.

तिसरी मागणी म्हणजे अनधिकृत मासेमारी होते, गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यांचे मंत्री येथे आले होते. याराज्याचे ट्रॉलर येथे येऊन मासेमारी करून जातात. त्यांच्यावर कारवाई करावी. एक कालावधी निश्चित करून मासेमारी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. या काही मागणी केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मागण्यांकडे पाहिले जाईल असेही मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावावे

ज्या काँग्रेसने भगवा आतंकवाद असा उल्लेख केला होता. म्हणून दहशतवादाला रंग नाही असे वडेट्टीवार कसे म्हणू शकतात. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य ऐकावीत. त्यांची मानसिकता ही तुष्टीकरण आणि हिंदूंचा द्वेष करण्याची आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावावे असेही विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांनी म्हटले आहे.

…त्यांनी तात्काळ बॅग भरून निघावे, ज्यांना पाकिस्तानबद्दल प्रेम आहे त्यांनी तात्काळ बॅग भरून निघावे, अशा एकालाही इथे ठेवणार नाही. तंगड्या हातात देण्याची वेळ आणू नका असेही नितेश राणे यांनी म्हटले जाते. पाकिस्तानवर प्रेम येतेय त्यांनी अब्बाकडे निघून जावे, नाहीतर हा करण्याची भूमिका घ्यावी लागेल

अबु आजमी यांनी लोकांची भावना समजून घेतली पाहिजे, लोकांच्या मनात चीड आहे. जनसामान्यांमध्ये राग आहे तो विविध पद्धतीने निघत आहे. ncert च्या सातवीच्या धड्यातून मुघल सम्राटांचा इतिहास वगळला आहे.त्यावर बोलताना राणे यांनी जे पेरले आहे तेच उगवत आहे, औरंगजेब प्रेम कुणी सुरु केले. आमच्या मुलांना मुघलांचा इतिहास आणि प्रेम काँग्रेसमुळे दाखवले जात होते आता ते थांबेल असेही राणे यांनी म्हटले आहे.

योगेश कदम माझे मित्र आहेत

ते माझे मित्र आहेत. दुसऱ्यावर जाणारा बाण त्यांनी अंगावर का घेतला हे माहिती नाही? आपले हिंदूत्ववादी सरकार आहे, हेच दहशतवादी आणि जिहाद्यांना हवे आहे.जेव्हा दंगल घडली तेव्हा विटा आणि दगड कुणी मारले.याविरुद्ध आपण हिंदू म्हणून भूमिका घ्यायला हवी. पक्षाच्या चौकटीत राहू नये.हिंदू म्हणून एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून लढण्याची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.