Maharashtra College Reopen : राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार, कॉलेजबाबत नवे आदेश काय?

राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Maharashtra College Reopen : राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार, कॉलेजबाबत नवे आदेश काय?
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, औरंगाबाद
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 8:36 PM

मुंबई : राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार (Maharashtra College Reopen)अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. करोनाच्या नियमाचे (Corona) पालन करून महाविद्यालय सुरू होणार असल्याचे नवे आदेश काढण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे विचारात घेऊन राज्यातल्या शाळा (School Reopen) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याप्रमाणे सोमवारपासून राज्यातल्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी आहे, तिथे योग्य ती खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. शाळांबाबत निर्णय झाल्यानंतर कॉलेजही सुरू करण्यााबाबत राज्य सरकारकडून हलचाली सुरू होत्या. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला होता, अखेर त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याने कॉलेज सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश

राज्यातली महाविद्यालयं सुरू करताना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता कोरोनाची तिसरी लाट आल्याने धोका अजून वाढला आहे, मात्र बऱ्यापैकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्याने महाविद्यालये सुरू करण्याबाबत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याबाबत शासन सकारात्मक होते, त्याच अनुशंगाने हा निर्णय आज घेण्यात आला आहे. मुख्यमंंत्र्यांनी राज्यातली महाविद्यालये सुरू करण्यास आता हिरवा कंदील दाखवल्याने कॉलेज कॅम्पस पुन्हा बहरणार आहेत.

लसीचे दोन्ही डोस बंधनकारक

महाविद्यालीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थिती लावण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरू करताना सोबतच शासन लसीकरणावर भर देत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम आणखी वेगवान करण्यात आली आहे. गेल्या दोन अडीच वर्षापासून कोरोना कहर सुरू असल्याने अनेक परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना मुल्ल्यांकनाच्या आधारे पास करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत होते, त्यामुळे शासनाने कॉलेजबाबतही धाडसी निर्णय घेत, कॉलेजस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! एखाद्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे पाहता येतात का? तज्ज्ञ काय सांगतात?

‘…महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान’, मुख्यमंत्र्यांनी केले राष्ट्रीय पदक विजेत्यांचे अभिनंदन

मुंबई महापालिकेत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करु, भाजपचा संकल्प; फडणवीसांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.