‘…महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान’, मुख्यमंत्र्यांनी केले राष्ट्रीय पदक विजेत्यांचे अभिनंदन

राष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके, अग्निशमन सेवेतील शौर्यासाठी राष्ट्रपती पदक बाळू देशमुख यांना मरणोत्तर जाहीर झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट कामगिरीसाठीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्रा उद्धव ठाकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

'...महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान', मुख्यमंत्र्यांनी केले राष्ट्रीय पदक विजेत्यांचे अभिनंदन
ताडोबा हे जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठिकाण व्हावे यासाठी आराखडा तयार करा : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 6:07 PM

मुंबई: भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस (Union Home Ministry), अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र (Maharashtra) पोलीस दलाने 7 शौर्य पोलीस पदक (Police Medal ), 4 विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक आणि 40 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक पटकाविले आहे. तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील सात अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. “…महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांचे कामगिरी महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यानी या सर्व पदक विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीसाठी पाठबळ देणाऱ्या कुटुंबियांप्रतिही आदर व्यक्त केला आहे.

अग्निशमन सेवेतील रक्षक बाळू देशमुख यांना शौर्यासाठी सर्वोच्च असा ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ मरणोत्तर जाहीर झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी कृतज्ज्ञता व्यक्त करून, दिवंगत देशमुख यांच्या स्मृतींना वंदन केले आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील 40 अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पोलीस पदक

महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी गोपाळ उसेंडी, महेंद्र कुलेटी, संजय बकमवार, भारत नागरे, दिवाकर नरोटे, निलेश्वर पड, संतोष पोटावी यांना शौर्य पोलीस पदक तर अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, एसआरपीएफचे कमांडट प्रल्हाद खाडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, पोलीस उपनिपरीक्षक अन्वरबेग मिर्झा यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलातील 40 अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. याशिवाय उत्कृष्ट सेवेसाठी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्निशमक सुरेश पाटील, संजय म्हामूणकर, चंद्रकांत आनंददास यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील सात जणांना शौर्य पदक, चार जणांना उल्लेखनीय सेवा तर ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल हा बहुमान प्राप्त झाला त्याबद्दल सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.

पोलिसांच्या कामगिरीमुळे राज्याची मान गौरवाने उंचावलीः छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिनंदन करताना त्यांनी राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत पोलीस दलाचे योगदान अतिशय महत्वपूर्ण असून आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटविलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान राष्ट्रपती पदकाद्वारे करण्यात येतो. हा त्यांच्या कामाचा सर्वोच्च बहुमान असून पुरस्काराने त्यांच्यावर अधिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येते. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी ही अतिशय महत्त्वाची असून त्यांचा झालेला सन्मान हा राज्याची मान या गौरवाने अधिक उंचावली असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

यामध्ये नाशिक शहर पोलीस दलातील उपनिरीक्षक संजय अण्णाजी कुलकर्णी यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाचा सन्मान प्राप्त झाला आहे. या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

Republic Day special: प्रजासत्ताकदिनी तुम्हाला ट्रेंडी दिसायचंय? या बॉलिवूड अभिनेत्रींची स्टाईल कॉपी करा आणि दिसा क्लासी

Uttar Pradesh, Goa, Uttarakhand निवडणुकीत शिवसेनेचं चिन्ह ‘धनुष्यबाण’ -Tv9

वर्ध्याच्या घटनेने मी दु:खी, पंतप्रधानांचं ट्विट; मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर

Non Stop LIVE Update
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?.
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा...
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा....
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा..
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा...
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.