विद्यापीठांकडून महाविद्यालयांसाठी नियमावली जाहीर, उद्यापासून महाविद्यालये सुरु होणार

| Updated on: Oct 19, 2021 | 12:26 PM

राज्यातील महाविद्यालये अखेर उद्यापासून (20 ऑक्टोबरपासून) सुरु होणार आहेत. त्यासाठी राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी नियमावली जाहीर केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही महाविद्यालये सुरु करण्याबाबत नियमावली जाहीर केलीय.

विद्यापीठांकडून महाविद्यालयांसाठी नियमावली जाहीर, उद्यापासून महाविद्यालये सुरु होणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Follow us on

पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील महाविद्यालये अखेर उद्यापासून (20 ऑक्टोबरपासून) सुरु होणार आहेत. त्यासाठी राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी नियमावली जाहीर केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही महाविद्यालये सुरु करण्याबाबत नियमावली जाहीर केलीय. मात्र, यात सुस्पष्टता नसल्यामुळे विद्यापीठाशी सलग्न असलेल्या महाविद्यालयांनी सविस्तर नियमावलीची मागणी केलीय. (Colleges in the state will start from tomorrow, regulations announced by universities)

दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने नियमावली जाहीर केली असून 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानेही महाविद्यालयांसाठी नियमावली जाहीर केलीय. त्यानुसार कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. तर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष वर्ग भरवले जाणार नाहीत, तर फक्त प्रात्यक्षिके होणार आहे.

महाविद्यालये सुरु करण्यावरुन संभ्रमाची स्थिती

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महाविद्यालये 12 ऑक्टोबरपासून सुरु होतील, असं उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी 8 ऑक्टोबर रोजी जाहीर केलं होतं. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांमधील संग्रमावस्था आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला. कारण, महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भांत अधिकृत पत्र आमच्या विभागानं दिलं नाही, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळाला होता.

महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंतांची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 13 ऑक्टोबर मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील महाविद्यालये येत्या 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याती महत्त्वाची घोषणा केली होती. यावेळी उदय सामंत यांनी महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच महाविद्यालये, विद्यापीठांसाठी असलेल्या नियमावलींची माहिती देखील दिली.

कॉलेज प्रवेशासाठी विद्यार्थी आणि महाविद्यालयांसाठी नेमकी नियमावली काय?

“विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन तिथल्या प्राधिकारणाशी चर्चा करुन म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मोठ्या पद्धतीने लसीकरणाचे काम विद्यापीठात किंवा विद्यापीठाच्या प्रांगणात करावे. ज्या क्षेत्रात कोरोना असू शकतो, कोरोना कमी झालाय किंवा कोरोना वाढू शकतो त्या क्षेत्रातले आयुक्त, महापालिका किंवा जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यपस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येणाऱ्या कोविड 19 आजाराचा स्थानिक पातळीवरील परिस्थिती बघून विद्यापीठ आणि प्राधिकरणाने पुढचे निर्णय घ्यावे, असं आम्ही जीआरमध्ये म्हटलं आहे”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

शहांसोबत सहकारावर चर्चा, दिल्लीत महत्त्वाची बैठक, फडणवीस, दानवेंसह विखे-पाटीलही उपस्थित राहणार

बुद्धिस्ट सर्किटसाठी केंद्राचं एक पाऊल पुढे, कोलंबोवरून कुशीनगरला पहिलं आंतरराष्ट्रीय विमान लँडिंग होणार; मोदी करणार उद्घाटन

Colleges in the state will start from tomorrow, regulations announced by universities