हे काय भलतेच.. आळूच्या झाडाला आले फूल? औरंगाबादेत निसर्गाची किमया पाहण्यासाठी उत्सुकांच्या रांगा

अंगणात, घराभोवती बाग फुलवणाऱ्या हौशी मंडळींकडे भाजी-पाल्याची रोपं असतील (Kitchengarden) तर त्यात एक रोप हमखास असते.

हे काय भलतेच.. आळूच्या झाडाला आले फूल? औरंगाबादेत निसर्गाची किमया पाहण्यासाठी उत्सुकांच्या रांगा
औरंगाबादमधील वाळूज परिसरात अळूच्या झाडाला आलेले पिवळे फूल सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

औरंगाबाद: अंगणात, घराभोवती बाग फुलवणाऱ्या हौशी मंडळींकडे भाजी-पाल्याची रोपं असतील (Kitchengarden) तर त्यात एक रोप हमखास असते. ते म्हणजे अळूचे. भरपूर पाणी असलेल्या किंवा जिथे सांडपाणी असते, त्या ठिकाणी ही अळूची रोपे लावली जातात. औरंगाबादमधील वाळूज परिसरातील राजू राजपूत (Raju Rajput) यांनीही आपल्या घराबाहेरील कुंडीत अळूचा कंद चार महिन्यांपूर्वी लावला होता. पण सोमवारी या रोपट्याला चक्क पिवळ्या रंगाचे फुल आले आहे. त्यामुळे राजपूत यांच्या घरातील कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. तसेच परिसरातील नागरिकही हे आळूचे फूल पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

चार महिन्यांपूर्वी वैजापूरहून आणले होते रोप

अळूची भजी, अळूच्या वड्या, अळूची आंबटगोड भाजी खाणाऱ्या आपल्यापैकी बहुतांश जणांना आळूच्या झाडाला फक्त पानंच येतात हेच माहिती आहे. वाळूज परिसरातील गणेश सोसायटीत राहणाऱ्या राजू यांनी सांगितले की, चार महिन्यांपूर्वी त्यांनी सटाण्याहून या अळूची चार-पाच रोपं आणली होती. ही रोपं प्लास्टिकच्या कुंडीत लावून परसबाहेत ठेवली होती. इतर झाडांप्रमाणेच ते या झाडांची जोपासना करतात. पण सोमवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी झाडाला पाणी घालत असताना राजू यांच्या पत्नी तुळसाबाई यांना या झाडाला फुल आल्याचं दिसलं. तसेच झाडाला आणखी एक कळीही असल्याचे दिसले. हा काहीतरी निसर्गाचा चमत्कारच आहे, असे त्यांना वाटले. आळूच्या झाडाला फुल आलेले आतापर्यंत कुणीही पाहिलेले नसेल. त्यामुळे या घटनेची चर्चा कानोकान पसरली आणि हौशी मंडळींनी हे झाड पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली.

वनस्पतींचे जाणकार काय म्हणतात?

आळूच्या झाडाचे  वनस्पती शास्त्रातील नाव कोलोकेशिया एसक्यूलँटा असे आहे. या वनस्पतीला बहुतांश वेळा पानेच असतात. फुले कधीही येत नाहीत. कोलोकेशिया आणि अलोकेशिया या दोन्ही वनस्पती अरेसी या वर्गात मोडतात. अलोकेशिया या वनस्पतीची पानेदेखील आळूच्या पानासारखीच असतात. तसेच आपल्या आजूबाजूला आपण पाहिले तर आळूच्या पानांच्या आकारात, रंगात फरक असलेली विविध झाडेही आपल्याला दिसून येतात. पण त्यापैकीच फक्त कोलोकेशिया जातीच्या झाडाची अर्थात अळूची पानेच भाजी म्हणून खाण्यासाठी योग्य असतात. आपण खातो त्या कोलोकेशिया म्हणजेच अळूच्या झाडाला कधीही फुले येत नाहीत. मात्र या गटातील अलोकेशिया जातीच्या वनस्पतीला कधी कधी फूलं येतात. औरंगाबादमधल्या झाडाला आलेले फूल हे याच वनस्पतीचे आहे. कुंडीत लावलेली ही वनस्पती आलोकेशिया जातीची असून तो नेहमी वापरात असलेला अळू नाही. त्यामुळे तो खाण्यासाठी योग्य आहे की नाही हादेखील एक संशोधनाचा विषय आहे, अशी माहिती परभणी येथील ,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील  हॉर्टिकल्चर विभागाचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. संतोष बरकुले यांनी दिली.

इतर बातम्या –

ग्रहांच्या शांतीसाठी आयुर्वेदात आहेत खात्रीशीर उपाय, जाणून घ्या कोणत्या ग्रहासाठी कोणत्या झाडाचे मूळ धारण करावे!

झेंडूचं फूल तोडल्यानं मारहाण, पपईची बाग कापून बदला, नंदुरबार पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI