कुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे गाड्या भंगारात विकल्या, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

| Updated on: Jun 07, 2021 | 1:19 PM

यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पेट्रोल, डिझेलची दरवाढ तातडीने मागे घ्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. (Congress Agitation against Petrol Diesel Price hike)

कुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे गाड्या भंगारात विकल्या, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक
Congress Agitation against Petrol Diesel Price hike
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला फटका बसत आहे. सतत सुरु असलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, वर्धा यांसह ठिकठिकाणी जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर काँग्रेस कमिटीकडून निदर्शन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पेट्रोल, डिझेलची दरवाढ तातडीने मागे घ्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. (Congress Agitation against Petrol Diesel Price hike)

कोल्हापुरात पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन 

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आज काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन केले. कोल्हापुरात शेतकरी पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील सहभागी होणार आहे.

पुण्यात 25 पेट्रोल पंपांसमोर आंदोलन

कोल्हापूरपाठोपाठ पुण्यात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात विविध ठिकाणच्या 25 पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करण्यात येत आहे. अलका टॉकीज चौकातील पेट्रोल पंपावर माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.

सोलापुरात गाड्या भंगारात विकून आंदोलन

सोलापुरात इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. सोलापुरात गाड्या भंगारात विकून आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक स्कुटी, गाड्या भंगारात विकण्यात आल्या. तसेच यावेळी दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पेट्रोल पंपपर्यंत टू व्हीलरची अंत्ययात्रा

इचलकरंजी शहरात शहर काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात निदर्शन करण्यात आली. मोदी सरकार चले जाव, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. तसेच शहरातील पेट्रोल पंप पर्यंत टू व्हीलरची अंत्ययात्रा काढण्यात आली. राज्यातील पेट्रोल डिझेल दर कमी करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मोदी सरकारच्या काळात इंधनदरवाढ नित्याची

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. आज नागपूरमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील तीन पेट्रोल पंपवर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी नागपूर प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली वर्धमान नगर चौकातील पेट्रोल पंप समोर इंधनदरवाढीचा निषेध करण्यात आला. मोदी सरकार आल्यापासून पेट्रोल डिझेलची दरवाढ नेहमीची झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करणाऱ्या जनतेला आता भाववाढीच्या निमित्ताने नवा झटका बसतो आहे.

मुंबई-पुण्यासह अनेक शहरात पेट्रोलचं शतक

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारात (Domestic Market) इंधनाच्या दरावरही झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Rate) सातत्याने वाढ होत आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये आज (सोमवार, 7 जून 2021) पेट्रोल दरात प्रतिलीटर 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दरही 27 पैशांनी वाढला आहे.

मुंबई, पुण्यासह इतर शहरात पेट्रोलच्या दराने शतक गाठलं आहे. आज पुणे शहरात पेट्रोलचा दर हा शंभरच्या पुढे गेला आहे. सध्या पुणे शहरात पेट्रोल हे प्रतिलीटर 101.38 रुपये इतका झाला आहे. तर डिझेलचा दर हा 91.94 रुपये इतका आहे. त्याशिवाय मुंबईत पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. मुंबईत पेट्रोल हे 100.98 रुपये प्रतिलीटर इतक्या दराने विकले जात आहे. तर मुंबईत डिझेलचा दर 92.99 रुपये एवढा आहे. (Congress Agitation against Petrol Diesel Price hike)

संबंधित बातम्या :

Petrol Diesel Price | इंधन दरवाढीचा भडका, महाराष्ट्रात पेट्रोल शंभरी पार, नवे दर काय?

सोन्याचा दर पुन्हा गगनाला भिडणार; वर्षाअखेरीस सोन्याचा प्रतितोळा भाव किती?

महागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय?