AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषद निवडणुकीसाठी शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर, कोणाला मिळाली उमेदवारी?

राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये आता काँग्रेसने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी अदिती पोहरे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर, कोणाला मिळाली उमेदवारी?
congress Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 6:46 PM
Share

राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये आता काँग्रेसने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी अदिती पोहरे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी याबात स्पष्ट संकेत दिले आहेत. अदिती पोहरे या देशोन्नती वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पोहरे यांच्या सून आहेत. अदिती पोहरे यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करताच यशोमती ठाकूर यांनी आदिती पोहेरे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

प्रा. अदिती पोहरे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. 6 डिसेंबर रोजी विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ संपत आहे. या शिक्षक मतदारसंघात लवकरच निवडणूक होणार आहे. त्यासाठी आता काँग्रेसच्या वतीने आदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  या जागेसाठी आता काँग्रेसच्या वतीने अदिती पोहरे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. आदिती पोहोरे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार? हे पहाणं महत्त्वांच ठरणार आहे.

महायुतीमध्ये रस्सीखेच 

दरम्यान दुसरीकडे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक अशा दोन्ही मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे मात्र पुण्याच्या पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने तर शिक्षक मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना शिंदे गट पुणे शिक्षक मतदारसंघासाठी इच्छूक आहे. तर दुसरीकडे भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही मतदारसंघावर दावा केला आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती