AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरसेवक दोन तास वेटिंगवर, अभिनेता सिद्धार्थ जाधवला महापौरांच्या दालनात थेट एन्ट्री; केडीएमसीत हायव्होल्टेज ड्रामा

महापौरांना भेटण्यासाठी काँग्रेस गटनेत्या कंचन कुलकर्णी दोन तास बाहेर थांबल्या. पण अभिनेता सिद्धार्थ जाधव थेट त्यांना भेटण्यास गेल्यामुळे कंचन कुलकर्णी यांनी संतापल्या. नेमकं काय घडलं?

नगरसेवक दोन तास वेटिंगवर, अभिनेता सिद्धार्थ जाधवला महापौरांच्या दालनात थेट एन्ट्री; केडीएमसीत हायव्होल्टेज ड्रामा
| Updated on: Jun 12, 2026 | 6:08 PM
Share

Kalyan : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनाबाहेर मोठा गोंधळ उडाला. काँग्रेसच्या गटनेत्या कंचन कुलकर्णी यांनी महापौरांच्या भेटीसाठी तब्बल दोन तास प्रतीक्षा करूनही भेट मिळत नसल्याने संताप व्यक्त करत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. याचवेळी अभिनेते सिद्धार्थ जाधव थेट महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत दाखल झाल्याने वादाला तोंड फुटले.

मिळालेल्या माहितीनुसार, कंचन कुलकर्णी या काही महत्त्वाच्या नागरी प्रश्नांसंदर्भात महापौरांची भेट घेण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात आल्या होत्या. मात्र, दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही त्यांना भेटीसाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्या नाराज झाल्या आणि महापौर दालनाबाहेरच त्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव हा महापौर आणि आयुक्तांची भेट घेण्यासाठी मुख्यालयात आला. त्याला थेट बैठकीत प्रवेश देण्यात आल्याचे पाहताच कंचन कुलकर्णी अधिक आक्रमक झाल्या. ‘लोकप्रतिनिधींना वेळ नाही आणि कलाकारांना थेट प्रवेश कसा दिला जातो?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवत, जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते, मात्र कलाकारांना थेट प्रवेश दिला जातो. सिद्धार्थ जाधव यांचे पालिकेसाठी नेमके योगदान काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच महापौर आणि आयुक्त लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

भेटीनंतर सिद्धार्थ जाधव काय म्हणाला?

कंचन कुलकर्णी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महापौर कार्यालयाबाहेर सुमारे वीस मिनिटे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच महापौर स्वतः दालनाबाहेर आले आणि त्यांनी कंचन कुलकर्णी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर महापौरांनी चर्चेसाठी कंचन कुलकर्णी यांना दालनात बोलावले. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर वातावरण निवळले आणि अखेर या वादावर पडदा पडला.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना अभिनेता सिद्धार्थ जाधवने वाद टाळण्याचा प्रयत्न केला. मी एका नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने भेटायला आलो होतो. इथे कोणालाही आडकाठी केली जात नाही. उलट प्रयोगाला सर्वांनी यावे, त्यासाठीच भेट घेतली असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. या घटनेनंतर केडीएमसीमधील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील संवादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं