AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फैसला अजून बाकी? हायकमांडचा मोठा निर्णय, महत्त्वाच्या घडामोडी घडणार

महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत वाद मध्यंतरी उफाळून आला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय.

महाराष्ट्र काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फैसला अजून बाकी? हायकमांडचा मोठा निर्णय, महत्त्वाच्या घडामोडी घडणार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 16, 2023 | 8:13 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या (Maharashtra Politics) पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत चांगल्याच घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिल्लीत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान कोर्टात आज दोन्ही गटाचा युक्तिवाद संपलाय. त्यामुळे हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाऊ शकतं किंवा निकालाची कधीही घोषणा होऊ शकते. या घटनेपाठोपाठ दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आणखी महत्त्वाची घडामोड घडलीय. महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत वाद मध्यंतरी उफाळून आला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय.

महाराष्ट्र काँग्रेसमधील सध्याच्या अंतर्गत गटबाजी आणि वादाची गंभीर दखल काँग्रेस हायकमांडने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस अतिशय सावधपणे पाऊल टाकणार आहे. पक्षातील हा वाद मिटवण्यासाठी नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील हे मुंबईत येऊन गेल्याची चर्चा होती. त्यानंतर आता काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील पक्षांतर्गत वादाविषयी माहिती घेण्यासाठी एका बड्या नेत्याची नेमणूक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्यातील काँग्रेसच्या परिस्थितीचा हायकमांड आढावा घेणार आहे. हा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राकडून रमेश चेंनिथलांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि काँग्रेसमधील एकंदरीत राजकीय स्थिती याबद्दल ते माहिती देणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नेमका वाद काय?

महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद हा सर्वश्रूत आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांमध्ये संघर्ष बघायला मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील अंतर्गत मतभेद उघडपणे चव्हाट्यावर आले होते.

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवत नाना पटोले यांची तक्रार केली होती. नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अवघड होऊन बसल्याचं थोरात आपल्या पत्रात म्हणाले होते. विशेष म्हणजे त्यांनी विधानसभेच्या गटनेतेपदाचा देखील राजीनामा हायकमांडकडे पाठवला होता. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बरंच काही घडलं. पण त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील मुंबईत आल्यानंतर घडामोडी बदलल्या. एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या राज्यातील सर्व दिग्गज नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीत वादानंतर पहिल्यांदाच नाना पटोले आणि थोरात समोरासमोर आले. दोघांनी एकत्र पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही, असं स्पष्ट केलं.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.