कसबा पेठेत कॉंग्रेसचं ठरलंय, गुलाल आमचाच म्हणत कॉंग्रेस तयारीला, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गटाचं काय?

कसबा पेठ पोटनिवडणूक तयारी शहर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे, काँग्रेस कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सज्ज आहे असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

कसबा पेठेत कॉंग्रेसचं ठरलंय, गुलाल आमचाच म्हणत कॉंग्रेस तयारीला, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गटाचं काय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 3:26 PM

पुणे : निवडणूक आयोगाने नुकतीच कसबा आणि चिंचवडच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लावली आहे. खरंतर दोन्ही जागा या भाजपच्या विद्यमान आमदारांच्या खाली झाल्या आहेत. कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या जागेची पोटनिवडणूक जाहीर केल्याने राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यात कसबा विधानसभा मतदार संघाची जागा लढविण्यासाठी कॉंग्रेसने तयारी सुरू केली आहे. पुणे शहराचे कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबत टीव्ही 9 मराठीला याबाबत माहिती दिली आहे. यावेळी शिंदे यांनी मागील काही निवडणुकीचा संदर्भ देऊन निवडणुक लढणारच हा ठाम निर्धार केला असून राष्ट्रवादी कॉंग्रेससह ठाकरे गटाने पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. याशिवाय कोल्हापूर, सोलापूर, अंधेरी या निवडणुका पाहता तेव्हा भाजप ने उमेदवार दिला. त्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी सुरू केली आहे असेही शिंदे यांनी स्पष्ट करून निवडणूक लढण्याचा विचार पक्का केल्याचे सांगितले आहे.

पुण्यातील कसबा विधानसभेची निवडणूक काँग्रेस लढण्याच्या तयारीत आहे, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली असून पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

यावेळी कॉंग्रेसच्या शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी जो उमेदवार काँग्रेसचा असेल तो कसबा पेठेचा मतदारसंघ गाजवेल असे विधान करून निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.

हे सुद्धा वाचा

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज आहे, काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यावेळी ही निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.

कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि पक्ष जो आदेश देतील त्याचे पालन होईल, कोल्हापूर, सोलापूर, अंधेरी या निवडणुका पाहता तेव्हा भाजप ने उमेदवार दिला. त्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी सुरू केली आहे.

कसबा पेठ पोटनिवडणूक तयारी शहर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे, काँग्रेस कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सज्ज आहे असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस मधून उमेदवार देण्याची प्रक्रिया असते. प्रदेश कमिटी कडून फायनल यादी येणार आणि तीच व्यक्ती निवडणूक लढवणार असेही स्पष्ट करत अरविंद शिंदे यांनी पोटनिवडणुकीत कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.