AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप चेटकीण, दुसऱ्या पक्षाचे नेते खाण्याचा रोग लागला; काँग्रेस नेत्याची खोचक टीका

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका करताना त्यांचे दावे पोकळ असल्याचा आरोप केला. भाजप दुसऱ्या पक्षांतील नेत्यांना धमक्या देऊन आपल्या पक्षात सामील करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप चेटकीण, दुसऱ्या पक्षाचे नेते खाण्याचा रोग लागला; काँग्रेस नेत्याची खोचक टीका
| Updated on: Jul 17, 2025 | 12:33 PM
Share

भाजपाकडे मोठे चमत्कार करणारे 56 इंच छातीचे नेतृत्व असून सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ते करत असतात, पण तो दावा पोकळ आहे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सोडून दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यावर दबाव आणून, धमक्या देऊन भाजपात घेत आहेत. भारतीय जनता पक्ष चेटकीण आहे, तीला दुसऱ्या पक्षातील लोक खाण्याचा रोग जडला आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा घमाघात केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष नेत्यांचा नाही तर विचाराचा पक्ष आहे, सर्वांना सोबत घेऊ जाणारा पक्ष आहे. कोणी पक्ष सोडून गेल्याने पक्षाची ताकद कमी होत नाही. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली नसली तरी आगामी काळात नक्कीच यात बदल होईल. जे लोक ठरवून पक्ष सोडून जातात त्यांना थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते थांबणार नाहीत. काँग्रेस पक्षाने ज्यांना आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री पद दिले त्यांनीही पक्ष सोडला. पक्ष सोडणारे आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत आहेत पण असा अन्याय आपल्यावरही व्हावा, अशी भावना पदाधिकारी बोलून दाखवत आहेत. जे पक्ष सोडून गेले त्यांना जनता व पक्षाचे कार्यकर्तेच जाब विचारतील असेही सपकाळ म्हणाले.

त्यांच्याकडून उत्पादन शुल्क खाते काढून घ्या

राज्यात दारू दुकानांचे परवाने काही कंपन्यांना देण्याचा प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, हे दारु परवाने खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री आहेत. तेच उत्पादन शुल्क खात्याचे मंत्रीही आहेत. टँगो नावाचा ब्रँड कोणाचा आहे हे सर्वांना माहित आहे. यात Conflict of interest स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे त्यांच्याकडून उत्पादन शुल्क खाते काढून घ्यावे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली टिळक कुटुंबाची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात टिळक कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्नतीत आणि ‘केसरी’च्या माध्यमातून सामाजिक भान निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते असे म्हटले आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे होते.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.