त्यांच्याशी 420 झाली असं त्यांच्या लोकांना वाटत असेल, तर..एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या विषयावरुन काँग्रेसच्या बड्या नेत्याचं महत्वपूर्ण विधान

काँग्रेसच्या राज्यातील एका बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विषयावरुन महत्वपूर्ण विधान केलं आहे. त्याचवेळी दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारवर टीकाही केली. दुष्काळाकडे सरकारने पाठ फिरवली होती.

त्यांच्याशी 420 झाली असं त्यांच्या लोकांना वाटत असेल, तर..एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या विषयावरुन काँग्रेसच्या बड्या नेत्याचं महत्वपूर्ण विधान
Eknath Shinde
| Updated on: Sep 29, 2026 | 12:57 PM

महाराष्ट्राचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसच आमदार नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगातील मतभेद आणि राज्यातील दुष्काळी स्थितीवरुन त्यांनी फडणवीस सरकारला लक्ष्य केलय. “निवडणूक आयोग ऐकायला तयार नाहीय. भाजपची कठपुतली बनून काम करत आहे. लोकशाहीची हत्या करण्याचं काम सुरु आहे. म्हणून निव़डणूक आयोगाच्या मदतीसाठी भाजपच्या सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांना वाचवण्यासाठी पुढे आले आहेत” असा दावा नाना पटोले यांनी केला. “लोकांच्या मताने निवडून ने येणारं सरकार केंद्रात आणि राज्यात बसलेलं आहे. त्यांना आता भिती निर्माण झाली आहे. जर निवडणूक आयोगाची पोल-खोल झाली तर पुढच्या काळात सत्ता येणार नाही, देश विकता येणार नाही अशी काळजी सत्तेत बसलेल्या लोकांना सुरु झाली आहे” अशी टीका नाना पटोलेंनी केली.

महायुतीत आलबेल आहे की नाही, शिवसेनेचे आमदार म्हणतायत की 2022 साली एकनाथ शिंदेंनी भूमिका घेतली नसती तर भाजप सत्तेवर आली नसती. त्या प्रश्नावरही नाना बोलले. “बघा, आपल्याला एकनाथ शिंदे जे वारंवार सांगत आहेत, मला केंद्रीय नेत़ृत्वाने सांगितलं होतं, तुम्ही निवडणूक जिंका, पुढच्यावेळेस तुम्हाला मुख्यमंत्री बनवू असं ते सांगत होते. आता त्यांच्याशी 420 झाली असं त्यांच्या लोकांना वाटत असेल, शिवसेनेच्या नेत्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं वाटत असेल, तर महायुतीत किती आलबेल आहे. राज्याचे तीनतेरा कसे वाजलेत ते दिसून येतं”

Loading...

वारंवार बोलून आम्ही दबाव निर्माण केला

“आपल्या राज्यात दुष्काळ पडला आहे. दुष्काळाकडे सरकारने पाठ फिरवली होती. वारंवार बोलून आम्ही दबाव निर्माण केला. कर्नाटकात सरकाने दुष्काळ जाहीर केला, महाराष्ट्रात का करत नाही?. महाराष्ट्रात आता सरकारने दुष्काळ जाहीर केलाय. पण जनतेचा त्यावर विश्वास बसत नाहीय” अशी टीका नाना पटोले यांनी केली.

बालिशपणा उघड झालाय

“राहुल गांधी कायम संवैधानिक संस्थेवर आरोप करतात. जिथे भाजपेतर सरकार निवडून येतात त्यावर न बोलता भाजप जिंकलेल्या राज्यात टीका करायची. राहुल गांधी उगाच संविधानाची प्रत हातात घेतात आणि संवैधानिक संस्थेवर टीका करतात. मात्र राहुल गांधी यांचा बालिशपणा उघड झालाय. गांधी बेछूट, बिनबुडाचे आरोप करतात” अशी टीका सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us