AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar : मी गुढी-बिढी काही उभारत नाही, विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य

मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का? इतर राज्यात का नाही, असा सवाल विचारत माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Vijay Wadettiwar : मी गुढी-बिढी काही उभारत नाही, विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य
विजय वडेट्टीवारImage Credit source: social media
| Updated on: Mar 31, 2025 | 8:39 AM
Share

राज्यात सध्या विविध वादांची मालिका सुरू आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेला वाद ताजा असतानाच, गेल्या आठवड्यात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतरांना उद्देशून गायलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे नवा वाद पेटला. त्यात कुणाल कामराने माफी न मागण्याचा निर्णय जाहीर करत आणखी काही व्हिडीओज पोस्ट केल्याने हे प्रकरण आणखीनच चिघळलं. हे सर्व वाद अजूनही शमलेले नसतानाच आता माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. गुढीपाडव्याबाबत एक विधान करत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चंद्रपूरमध्ये ते बोलत होते.

काय आहे वडेट्टीवार यांचं विधान ?

‘मी गुढी-बिढी काही उभारत नाही, छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे, आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी, आम्ही या भानगडीत पडत नाही, ज्याला पडायचं त्याला पडू दे, मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का? इतर राज्यात का नाही,’ असं म्हणत मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. यामुळे आता नवा वाद पेटू शकतो.

चंद्रपूर जिल्हा ग्रामीण आणि शहर काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या कुस्ती कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यामुळे आता नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

एकीकडे दिल्या शुभेच्छा, दुसरीकडे गुढीपाडव्याबाबत वादग्रस्त विधान

मात्र याच वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या आणि दुसरीकडे ते याच सणावर प्रश्न उपस्थित करत असल्याने संभ्रमाची स्थिती आहे. एकीकडे ते म्हणतात मी गुढी-बिढी काही उभारत नाही, पण याच वडेट्टीवार यानी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून याच सणासाठी शुभेच्छाही दिल्या. X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया साईटवरील अकाऊंटवर काल (रविवार) वडेट्टीवार यांनी एक ट्विट केलं. ‘ गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची! नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.’ अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या होत्या. पण त्यांनीच नंतर एका कार्यक्रमात गुढी पाडव्यावर प्रश्न उपस्थित केल्याने अनेकांनी त्यांच्या या दुहेरी भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी