AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय वडेट्टीवार यांचं एक्स अकाऊंट हॅक; तातडीने नागरिकांना केलं आवाहन

Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं एक्स (ट्विटर) अकाऊंट हॅक झालं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. अकाऊंट सुरक्षितपणे पुन्हा माझ्या ताब्यात येईपर्यंत सर्वांनी सहकार्य करावं, असं त्यांनी म्हटलंय.

विजय वडेट्टीवार यांचं एक्स अकाऊंट हॅक; तातडीने नागरिकांना केलं आवाहन
विजय वडेट्टीवारImage Credit source: Tv9
| Updated on: Sep 22, 2026 | 12:31 PM
Share

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील विधानसभेतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं अधिकृत X (ट्विटर) अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. वडेट्टीवार यांनी स्वतःच याबाबत लोकांना सतर्क केलं असून, अकाऊंट पुन्हा सुरक्षितपणे रिकव्हर होईपर्यंत त्यावरून होणाऱ्या कोणत्याही हालचालींशी आपला किंवा आपल्या कार्यालयाचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या सोशल मीडिया अकाऊंटला मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीचं अकाउंट हॅक झाल्यानंतर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिक आणि कार्यकर्त्यांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेषतः हॅक झालेल्या अकाऊंटवरून येणाऱ्या संशयास्पद पोस्ट, मेसेज किंवा लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

‘पोस्ट किंवा मेसेजशी माझा संबंध नाही’

वडेट्टीवार यांनी अकाउंट हॅक झाल्याची माहिती देताना, सध्या त्यांच्या X हँडलवरून होणाऱ्या कोणत्याही पोस्ट, मेसेज किंवा इतर कृतीशी त्यांचा अथवा त्यांच्या कार्यालयाचा संबंध नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने एखादी नवी पोस्ट किंवा मेसेज दिसल्यास तो अधिकृत आहे की नाही, याची खात्री केल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. यासंदर्भात त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे.

‘महत्त्वाची सूचना.. माझं ट्विटर/ एक्स अकाऊंट हॅक झालं आहे. सध्या या अकाऊंटवरून होणाऱ्या कोणत्याही पोस्ट, मेसेज किंवा इतर कृतीशी माझा कोणताही संबंध नाही. कृपया या अकाऊंटवरून येणाऱ्या कोणत्याही लिंक, मेसेज किंवा पोस्टवर विश्वास ठेवू नये आणि त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. अकाऊंट सुरक्षितपणे पुन्हा माझ्या ताब्यात येईपर्यंत सर्वांनी सहकार्य करावं,’ असं त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया अकाउंटच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. विशेषतः प्रसिद्ध व्यक्ती, राजकीय नेते आणि मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स असलेली अकाऊंट्स हॅकर्सच्या निशाण्यावर येत असल्याच्या घटना अलीकडे समोर आल्या आहेत.

Follow Us
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन अन्...
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकरी संकटात
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळे पाणावतील
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस