कोरोनात निराधार, विधवा झालेल्या महिलांसाठी योजना आखा, आमदार राजू पारवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: May 29, 2021 | 9:25 AM

उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. ‘कोरोनात निराधार, विधवा झालेल्या महिलांसाठी योजना आखा’, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे ( MLA Raju Parwe)

कोरोनात निराधार, विधवा झालेल्या महिलांसाठी योजना आखा, आमदार राजू पारवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Nagpur Corona Special Story
Follow us on

नागपूर : उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. ‘कोरोनात निराधार, विधवा झालेल्या महिलांसाठी योजना आखा’, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे (MLA Raju Parwe letter to the Chief Minister Requesting For The Plan For The Widowed Women In Corona).

योजना आखून कोरोनामुळे विधवा झालेल्या निराधार महिलांना मदत करा. तसेच, कोरोना निराधार पालकत्व योजना राज्यभर राबवण्याची मागणी आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनामुळे घरचा कर्ता पुरुष गेल्याने अनेक परिवारावर संकट ओढवलं आहे, त्यामुळे राजू पारवे यांनी ही मागणी केली आहे.

घरचा कर्ता पुरुष गमावल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर

कोरोनाने कधीही भरुन न निघणाऱ्या जखमा दिल्या आहेत. नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे सव्वादोन हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. यात तरुणांचीही मोठी संख्या आहे. विशी, पंचविशीतल्या तरुणी विधवा झाल्याने त्यांच्या जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. कुणी सात महिन्यांची गरोदर आहे तर कुणावर दोन मुलांची जबाबदारी आहे. तर कुणी घरी एकटं पडलं आहे. असे उघड्यावर पडलेली संसार बघून डोळे निश्चितच पाणवताय.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांचा मृत्यू झाल्याने, विशी-पंचविशीतल्या तरुणी विधवा झाल्या आहेत. ही समस्या फक्त नागपूर जिल्ह्यापूरतीच मर्यादीत नाही, तर राज्यभर अशाच प्रकारे अनेक परिवार उघड्यावर आलेय. त्यामुळे आ. राजू पारवे यांच्या प्रमाणेच समाज म्हणून लोकप्रतिनिधी, व्यावसायीक किंवा ज्यांना शक्य आहे, त्यांनी कोरोनाने अशाप्रकारे उघड्यावर आलेल्या कुटुंबियांना आधार देणं गरजेचं आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार मित्र परिवाराची मदत

कोरोनामुळे घरचा कर्ता पुरुष गमावल्याने अनेक परिवार रस्त्यावर आले आहेत. अशाच निराधार असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी मतदारसंघातील 350 पेक्षा जास्त कुंटुंबांना मंत्री विजय वडेट्टीवार मित्र परिवाराने प्रत्येकी दहा हजारांची मदत केलीय.

पाहा टीव्ही 9 मराठीचा हा खास रिपोर्ट –

MLA Raju Parwe letter to the Chief Minister Requesting For The Plan For The Widowed Women In Corona

संबंधित बातम्या :

ऑक्सिजन टँकर काळाबाजारावर अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन, गडकरींचा थेट विशाखापट्टनमला, पहा काय घडलं?

नागपुरातील प्रत्येक ऑक्सिजन टँकरसोबत आता पोलीस! गडकरींची माहिती, मुंबई महापालिका आयुक्तांचंही कौतुक

गडकरींनी करुन दाखवलं! वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेसमधून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर