पुणे : पुण्यातील कसबा पेठ (Kasaba Peth) आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कॉंग्रेससह (Congress) भाजपने (BJP) कसबा पेठच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुरुवातीपासूनच कसबा पेठ पोटनिवडणूक उमेदवारीवरुन चर्चेत राहिली आहे. यामध्ये भाजपने टिळक (Tilak) कुटुंबात उमेदवारी न देता हेमंत रासणे यांना उमेदवारी दिल्याने भाजपवर अन्याय केल्याचा आरोप होऊ लागला आहे. याबाबत पुण्यात फलकबाजी बघायला मिळाली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांनी अर्ज दाखल केला आहे.