Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या आरोपावर अण्णा हजारे यांचे वक्तव्य, असे झाले तर देशात आग लागणार

anna hazare: केजरीवाल मद्याच्या नशेतून आलेल्या पैशांच्या नशेत बुडाले आहेत. मी अरविंदला अनेक वेळा सांगितले, चारित्र सांभाळा, विचार शुद्ध ठेवा. परंतु मद्याचा पैसा मिळताच त्यात केजरीवाल तुडंब बुडाले आहे.

काँग्रेसच्या आरोपावर अण्णा हजारे यांचे वक्तव्य, असे झाले तर देशात आग लागणार
anna hazare
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 10:42 AM

राज्यात सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचाही चौथ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. अण्णा हजारे यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी राळेगणसिद्धीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यानंतर लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस आणि विरोधकांकडून होत असलेल्या आरोपावर अण्णा हजारे यांनी उत्तर दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र भाजपवर असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. यावर अण्णा हजारे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अण्णा हजारे

कोणत्याही सरकारने किंवा पक्षाने संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देश पेटेल. आपले संविधान परिपूर्ण आहे. ते बदलण्याची गरज आहे का? भारताचे संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे. त्यात कोणीही बदल करण्याचा प्रयत्न करू नये, असे अण्णा हजारे यांनी स्पष्टच सांगितले.

हे सुद्धा वाचा

प्रत्येकाने मतदान करावे

देश मजबूत करायचा असेल तर मतदान केले पाहिजे, चारित्र्यवानांच्या हातात देश देण्याची गरज आहे. अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. केजरीवाल मद्याच्या नशेतून आलेल्या पैशांच्या नशेत बुडाले आहेत. मी अरविंदला अनेक वेळा सांगितले, चारित्र सांभाळा, विचार शुद्ध ठेवा. परंतु मद्याचा पैसा मिळताच त्यात केजरीवाल तुडंब बुडाले आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांनी पुन्हा एकदा महायुती म्हणजेच एनडीएकडून निवडणूक लढवली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांना लोकसभेचे उमेदवार करण्यात आले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या लोकसभेच्या जागेकडे लागले आहे.

मुंबईतील जैन मंदिरावर पालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक, मागणी काय?
मुंबईतील जैन मंदिरावर पालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक, मागणी काय?.
'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले
'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले.
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.