औरंगाबादची कोरोनावर मात, बाधित महिला सात दिवसानंतर ठणठणीत

औरंगाबादमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा आज (21 मार्च) निगेटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने सुटकेचा निःश्वास (Corona patient report negative aurangabad) सोडला.

औरंगाबादची कोरोनावर मात, बाधित महिला सात दिवसानंतर ठणठणीत

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा आज (21 मार्च) निगेटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने सुटकेचा निःश्वास (Corona patient report negative aurangabad) सोडला. मात्र काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या कोरोनाबाधित महिलेला तब्बल सात दिवस विलगिकरण कक्षात ठेवून तिच्यावर उपचार सुरु (Corona patient report negative aurangabad) होते.

ही महिला 15 मार्च रोजी रशियावरुन औरंगाबादमध्ये आली होती. औरंगाबादमध्ये आल्यावर या महिलेला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्यावर उपचार सुरु असताना तिला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले होते.

कोरोना झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले होते. जगभर दाणादाण उडवणारा एक आजार आपल्या आसपास घोंगवतो आहे. या विचाराने प्रत्येक औरंगाबादकर घाबरून गेला होता आणि प्रत्येकाच्या मनात एकच विचार घोंगावत होता की आता पूढे काय होणार. पण सुदैवाने आज महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने औरंगाबाद शहर कोरोना मुक्त झाले आहे.

कोरोना बाधित महिला ही पर्यटनासाठी रशियाला गेली होती. राशियावरुन येता येता या महिलेने काझीगस्नातही भेट दिली आणि या दरम्यान या महिलेला करोनाची लागण झाली. 5 तारखेला औरंगाबाद शहरात दाखल झालेला या महिलेला सुरुवातीला कुठलीच लक्षण आढळली नाहीत. त्यामुळे या महिलेने आपल्या नियमित कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे धडे घेतले. मैत्रिणींच्या भेटी घेतल्या, काही छोट्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली आणि अचानक 12 तारखेला ताप खोकला श्वास घेण्यास अडथळा वाटू लागले. त्यामुळे महिलेला रुग्णालयात दाखल केलं. तेंव्हा डॉक्टरांना ही सगळी लक्षणं कोरोना सुदृष् दिसली आणि तातडीने रुग्णालयात दाखल करून नमुने तपासणीसाठी पाठवले आणि तपासणीनंतर महिलेला कोरोना झाल्याचे सिद्ध झाले.

महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच आरोग्य यंत्रनेसह सर्वांचे धाबे दणाणले आणि युद्धपातळीवर कामाला सुरुवात झाली. महिलेच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी झाली आणि जवळपास 750 लोकांना कोरंटाइन करण्यात आलं होते.

परंतु आज अखेर या बाधित महिलेचा अहवाल निगजेटीव्ह आल्यामुळे सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला आहे.

Published On - 8:14 pm, Sat, 21 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI