लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला… कोरोना आणि मृत्यूबाईच्या लग्नाची अनोखी पत्रिका

"लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला...कोरोना विषाणू आला हो दारी, तुम्ही आता तरी रहा घरी..." (Corona Wedding Invitation Card), या म्हणीला साजेस अशा एका लग्नाच्या पत्रिकेची चर्चा सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला... कोरोना आणि मृत्यूबाईच्या लग्नाची अनोखी पत्रिका
Corona Wedding Invitation
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 1:52 PM

लासलगाव : “लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला…कोरोना विषाणू आला हो दारी, तुम्ही आता तरी रहा घरी…” (Corona Wedding Invitation Card), या म्हणीला साजेस अशा एका लग्नाच्या पत्रिकेची चर्चा सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती म्हणजे ‘कोरोना‘चे लग्न ‘मृत्यूबाई’शी. सुरुवातीला नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या येवल्यातील अभिनव फाउंडेशन ने ही लग्न पत्रिका छापली आहे (Corona Wedding Invitation Card).

कोरोना विषाणूची राज्यात दुसरी लाट आली असल्याने त्यात सध्या गावोगावी लग्नसोहळ्याची धूम सुरु असून त्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्यतेमुळे राज्य सरकार सतर्क झालेला आहे. विवाह सोहळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण व्हावी यासाठी येवला येथील अभिनव फाउंडेशनच्या वतीने एक लग्न पत्रिका तयार करण्यात आली आहे.

पत्रिकेची सुरुवातच यमराजाचे चित्र आणि यमराज प्रसन्न कशी करत सुरुवातीला यमराजाची कृपा होण्याच्या आधीच हा घातक विषाणू भारतातून हाकलून लावण्याचे आहवान या पत्रिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

कोरोना विषाणू हा चीनमधून आल्याने चीनचा दत्तक पुत्र चि. कोरोना तर मृत्युमुखी पडल्यानंतर यमराज घेऊन जातात म्हणून चि.सौ.कां मृत्यूबाई त्यांच्या, संसर्गजन्य शुभ विवाहाची आमंत्रण पत्रिकेतून तुम्ही घरीच राहावा हा संदेश पत्रिका जुळणाऱ्या चपखलपणे देत नम्र विनंती करण्यात आली आहे.

ती अशी की…

जा जा… पत्रिका मार भरारी, जाऊन सांग सोयऱ्यांच्या घरी,

विषाणू संसर्ग फार आहे जहरी, सर्वजण रहा आप-आपल्या घरी…

तरी आपण सहकुटुंब सहपरिवार घरातच राहावे ही नम्र विनंती

Corona Wedding Invitation

Corona Wedding Invitation

आपले विनीत…

आरोग्य विभाग, केंद्र सरकार भारत

आरोग्य विभाग, राज्य सरकार महाराष्ट्र

वरील विनंतीस मान देऊन घरात राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती,

समस्त जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन ग्रामपंचायत कार्यालय महाराष्ट्र (Corona Wedding Invitation Card)

विवाह मुहूर्त…

संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्या आल्या लगेच

विवाहस्थळ…

सर्व गर्दीच्या जागा

आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हा…

चि. ताप, चि. खोकला, कु. सर्दी, कु. महामारी

सर्वच लग्नपत्रिकेत एक टीप असते, ती म्हणजे आहेर आणू. नका मात्र यात आगळीवेगळी अशी टीप आवर्जून घातलीय आहे की ती…

टीप – प्रत्येकाने शुभ आरोग्यासाठी मास्क व सानिटायझर वापरणे तसेच आपापसात दोन मीटर अंतर ठेवावे

Corona Wedding Invitation Card

संबंधित बातम्या :

नागपुरात येत्या शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा भडका, तब्बल 8807 नवे रुग्ण, पिंपरीत लस घेतलेल्या तिघांना कोरोना

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.