“जो व्यक्ती कुटुंबाला वाऱ्यावर सोडतो, मतदारांना का सोडणार नाही”; ईडीच्या कारवाईवरून भाजपने ‘या’ नेत्याच्या वर्मावरच घाव घातला…

| Updated on: Mar 14, 2023 | 6:53 PM

इतर नेत्यांवर ज्यावेळी कारवाई झाली त्यामध्ये संजय राऊत, अनिल परब, नवाब मलिक यांना समन्स आल्यानंतर स्वतःहून हजर झाले होते असा टोलाही त्यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला आहे.

जो व्यक्ती कुटुंबाला वाऱ्यावर सोडतो, मतदारांना का सोडणार नाही; ईडीच्या कारवाईवरून भाजपने या नेत्याच्या वर्मावरच घाव घातला...
Follow us on

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील आमदार आणि श्रावणबाळ म्हणून ओळख असणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून दोन वेळा छापेमारी करण्यात आली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापेमारी केल्यानंतर कोल्हापूरातील भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजूनही ईडीचे अधिकारी कोल्हापूरमध्येच असल्याने आणखी काही या प्रकरणातून बाहेर पडणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तर दुसरीकडे कागल तालुक्यातील भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आमदार हसन मुश्रीफ हे ईडी कारवाईवेळी हा माणूस मागच्या दाराने पळून का गेला असा सवाल समरजित घाटगे यांनी व्यक्त केला आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप आक्रमक झाली आहे. त्यामुळे भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

ज्यावेळी ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई झाली त्यावेळी ते मागच्या दाराने ते पळून तर गेलेच मात्र त्यानंतर हसन मुश्रीफ 52 तास फरार का होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे आता राजकारण प्रचंड तापले आहे. समरजित घाटगे यांनी त्यांच्या कारवाईनंतर त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करून हसन मुश्रीफ यांच्या लोकप्रतिनिधीत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीकडून कारवाई करण्यात आली त्यावेळी हसन मुश्रीफ हे घरातील मुख्य पुरूषच घरातून पळून गेले.

ईडीच्या कारवाईला घाबरून ते पळून गेले खरं मात्र त्यांच्या त्यानंतर त्यांच्या घरातील महिलांना ते एकटं सोडून पळून गेल्याची खरमरीत टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

यावरूनही त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जो व्यक्ती कुटुंबाला वाऱ्यावर सोडतो तो मतदारांना आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडणार नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हसन मुश्रीफ हे कारवाईनंतर मागच्या दाराने पळून गेलेले होतेच मात्र त्याचवेळी त्यांचा लेखापालही फरार असणं ही खूप गंभीर बाब असल्याचे समरजित घाटगे यांनी सांगितले आहे.

गेल्या 7 दिवसांपासून महेश गुरव फरार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मुश्रीफांच्या प्रकरणात तो फरार आहे की त्याला फरार केलं याचे उत्तर हसन मुश्रीफ यांनी द्यावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

यावेळी समरजित घाटगे यांनी इतर नेत्यांची नावं घेत सांगितले की, इतर नेत्यांवर ज्यावेळी कारवाई झाली त्यामध्ये संजय राऊत, अनिल परब, नवाब मलिक यांना समन्स आल्यानंतर स्वतःहून हजर झाले होते असा टोलाही त्यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला आहे.