‘ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही त्यांची वीजतोडणी थांबवा’, आता कृषीमंत्र्यांचंच ऊर्जामंत्र्यांना आवाहन

| Updated on: Dec 20, 2021 | 6:42 PM

वीज तोडणी मोहीम सुरु असल्याच्या पार्श्वभूमवीर दादा भुसे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांची वीज बिल भरण्याची परिस्थिती नाही. त्यांची वीज तोडणी थांबवा. तर ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांनी चालू बिल भरावं. आम्ही ऊर्जा विभागाला विनंती करतो की शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात येऊ नये.

ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही त्यांची वीजतोडणी थांबवा, आता कृषीमंत्र्यांचंच ऊर्जामंत्र्यांना आवाहन
दादा भुसे, नितीन राऊत
Follow us on

मुंबई : राज्यात वीज बिल वसुली आणि वीज तोडणीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत, शेतकरी संघटनाही आंदोलनं करत आहेत. शेतात भिजणं सुरु असताना शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणकडून (MSEDCL) सुरु आहे. दुसरीकडे कुणालाही वीज फुकट मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणत आहे. या पार्श्वभूमीवर आता कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनीच ऊर्जामंत्र्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही त्यांची वीज तोडू नका, असं आवाहन भुसे यांनी नितीन राऊतांना केलंय.

वीज तोडणी मोहीम सुरु असल्याच्या पार्श्वभूमवीर दादा भुसे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांची वीज बिल भरण्याची परिस्थिती नाही. त्यांची वीज तोडणी थांबवा. तर ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांनी चालू बिल भरावं. आम्ही ऊर्जा विभागाला विनंती करतो की शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात येऊ नये. ऊर्जा विभाग सांगत आहे की 60 हजार कोटी वीज बिल थकित आहे. त्यामुळे ऊर्जा विभाग अडचणीत येऊ शकतो. ही वस्तूस्थिती असलली तरी शेतकऱ्यांची वीज तोडू नका, असं आवाहन दादा भुसे यांनी केलं आहे.

कुणालाही फुकट वीज मिळणार नाही- नितीन राऊत

महावितरण कंपनी स्वतः वीज विकत घेऊन नागरिकांना वीज पुरवठा करते. त्यामुळे जे वीजेचा वापर करतात, त्या सर्वांना पैसे भरावेच लागतील. कोणालाही वीज फुकट मिळणार नाही. कोरोनामुळे इतर विभागांप्रमाणे महावितरणदेखील अडचणीत आले आहे. सध्या महावितरणची थकबाकी 71 हजार कोटी रुपयांची आहे. ग्राहकांनी बिले भरली तरच महावितरणचा कारभार सुरुळीत चालू शकेल, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांनी वीज बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केलं आहे.

बिल माफ करण्याच्या मागणीवर काय म्हणाले मंत्री?

या बैठकीत लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडून चालू एक बिल माफ भरून घेण्यासंबंधी मागणी केली. राज्याकडून शेतीपंपांच्या वीज बिलासाठी विशेष आर्थिक मदत दिली तर सवलत देता येईल, अन्यथा कंपनी चालवायची असेल तर किमान चालू दोन वीज बिले भरून घेणे आवश्यक असल्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. मात्र काही शेतकऱ्यांकडे मोठी थकबाकी आहे, त्यांना हप्त्याची सवलतही दिल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या :

‘राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत’, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

‘परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधण्याची गरज’, दरेकरांकडून सीबीआय चौकशीची मागणी