‘परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधण्याची गरज’, दरेकरांकडून सीबीआय चौकशीची मागणी

पोलिसांनी सुपे आणि त्याच्या मेहुण्याच्या घरावर छापा टाकला असता मोठं घबाड हाती लागलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी विरोधक करत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही त्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

'परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधण्याची गरज', दरेकरांकडून सीबीआय चौकशीची मागणी
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 5:13 PM

मुंबई : राज्यातील विविध परीक्षेतील मोठा घोटाळा (Exam Scam) आता समोर आला आहे. आरोगय भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर (Paper Leak) पुणे पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. त्यावेळी म्हाडाचा पेपर फोडल्याचं प्रकरण समोर आलं. याचा तपास सुरु असताना आता महा टीईटी परीक्षेतील मोठा गैरप्रकार समोर आला आहे. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला (Tukaram Supe) अटक केली आहे. पोलिसांनी सुपे आणि त्याच्या मेहुण्याच्या घरावर छापा टाकला असता मोठं घबाड हाती लागलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी विरोधक करत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही त्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

भरती परीक्षांमधील घोटाळा आणि त्यातून कमावलेले कोट्यवधी रुपये आता जनतेसमोर आले आहेत. असं चित्र यापूर्वी महाराष्ट्रात कधी पाहिलं नव्हतं. पण हे सरकार आल्यापासून फक्त आणि फक्त वसुली सुरु असल्याचं अनेकदा स्पष्ट झालं आहे. आता याची गंभीर दखल घेत हे प्रकरण सीबीआयकडे द्यावं आणि याचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधून काढायची गरज आहे, असं दरेकर म्हणाले. तसंच दरेकर यांनी या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांकडूनही सीबीआय चौकशीची मागणी

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फढणवीस यांनीही परीक्षा घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. ‘टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले. आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी’, असं ट्वीट फडणवीस यांनी केलीय.

तसंच ‘सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा’, असंही फडणवीस यांनी म्हटलंय.

पुणे पोलिसांच्या हाती कितीचं घबाड?

पुणे पोलिसांना तुकारामा सुपेच्या घरात 2 कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी सोनं देखील जप्त केलं आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अद्याप तपास सुरु आहे, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. तसंच सुपे यांच्या घरातून 88 लाख 49 हजार 980 रोख, पाच ग्राम सोन्याचे नाणे, 5 लाख 50000 हजार रुपयांची एफ डी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय सुपेने त्याच्या मित्राला लाखो रुपये दिल्याचेही माहिती मिळाली आहे, असं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या :

‘..तर घरा-दारासकट सगळं सोडून जातो’, आमदार सुरेश धसांचं भ्रष्टाचाराच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर

राजीनामा देऊन निवडणुका घ्यायच्या तर आधी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा; नाना पटोलेंचा पलटवार

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.