AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jain Muni : जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत, तुम्हाला उत्तर मिळणार, जैन मुनी निलेशचंद्र यांची मनसेला वॉर्निंग

MNS : "आता मी डहाणूला गेलेलो 25 हजार लोक धर्म सभेत सहभागी झाल होते. तिथे लव्ह जिहाद झालय. संदीप देशपांडे तिथे तुम्ही कधी जाणार, मुस्लिमांचं तोंड काळ करण्यासाठी" असा सवाल जैन मुनी निलेशचंद्र यांनी विचारला.

Jain Muni : जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत, तुम्हाला उत्तर मिळणार, जैन मुनी निलेशचंद्र यांची मनसेला वॉर्निंग
Jain Muni Nileshchandra-Raj Thackeray
| Updated on: Jun 13, 2026 | 5:20 PM
Share

जैन धर्मीयांनी रस्त्यावर मारलेल्या पांढऱ्या पट्टयांवरुन आज दादरमध्ये मोठा वाद झाला. याआधी घाटकोपरमध्ये वाद झालेला. जैन धर्म गुरुंना चालण्यासाठी या पांढऱ्या पट्टया मारण्यात आलेल्या. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे, अशी भूमिका मनसेने मांडली. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ या पांढऱ्या पट्टया आल्यानंतर त्यांनी इशारा दिला. त्यांनी दुपारी 3 पर्यंतची वेळ दिली होती. 3 पर्यंत पांढरी पट्टी काढा नाहीतर मनसे स्टाइलने उत्तर देऊ असा संदीप देशपांडे यांनी इशारा दिला होता. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून मुंबई महापालिकेने तात्काळ तिथे जाऊन या पांढऱ्या पट्टया हटवल्या.

आता जैन मुनी निलेशचंद्र यांनी मनसेला इशारा दिला आहे. “पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक आहे. राज्यातला अनेक मंदिरांमध्ये पांढरा रंग मारलेला आहे. संदीप देशपांडे यांनी भिवंडी मध्ये जावं, त्या ठिकाणी सर्व हिरवं हिरवं आहे” असं निलेशचंद्र मुनी म्हणाले. “येत्या काळात मनसेला उत्तर योग्य वेळी दिले जाईल. जैन धर्म गुरू यांना चालण्यासाठी त्या पट्ट्या मारल्या आहे तो काही दहशतवाद नाही. अशा पद्धतीने जातियवाद करतात म्हणून मनसेचे आमदार, खासदार, नगरसेवक निवडून येत नाहीत” असं निलेशचंद्र मुनी म्हणाले.

‘असं नाहीय की जैन समाज शांतीप्रिय आहे’

“भारतात सर्व पंथ, संप्रदायाना आपल्या धर्माचं पालन करण्याच माननीय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने अधिकार दिला आहे. कुठल्याही धर्माचा अपमान करणं हे कायद्याच्या विरुद्ध आहे. संदीप देशपांडे तुम्ही दोन धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात. असं नाहीय की जैन समाज शांतीप्रिय आहे. जैन समाज शांती प्रिय आहे. सफेद रंग शांततेचा प्रतीक आहे. जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत. वेळ आल्यावर तुम्हाला उत्तर दिलं जाईल” असा थेट इशाराच निलेशचंद्र मुनी यांनी दिला.

‘जितका धोका जैनांपासून नाही, तितका मुस्लिमांपासूनआहे’

“माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा महाराष्ट्रात जीतयवाद, धर्मवाद नव्हता. आज बाळासाहेब नाहीत, त्यामुळे त्यांचे विचारही संपले आहेत. संदीप देशपांडे महाराष्ट्राला जितका धोका जैनांपासून नाही, तितका मुस्लिमांपासूनआहे. मुंब्र्यामध्ये जा तिथे काळीपट्टी लावा” असं संदीप देशपांडे यांना जैन मुनीने सुनावलं.

‘तिथे तुम्ही कधी जाणार, मुस्लिमांचं तोंड काळ करण्यासाठी’

“आता मी डहाणूला गेलेलो 25 हजार लोक धर्म सभेत सहभागी झाले होते. तिथे लव्ह जिहाद झालय. तिथे तुम्ही कधी जाणार, मुस्लिमांचं तोंड काळ करण्यासाठी. दोन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. आम्ही तुम्हाला योग्यवेळी उत्तर देऊ” असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र यांनी दिला.

 

Follow Us
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार