शेवटी लाडक्या बहिणींना ती खुशखबर आलीच, एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत थेट सांगून टाकलं, म्हणाले ही योजना …

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथील सभेत बोलतान लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून महिलांना जी चिंता लागली होती, ती मिटवून टाकली आहे.

शेवटी लाडक्या बहिणींना ती खुशखबर आलीच, एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत थेट सांगून टाकलं, म्हणाले ही योजना ...
eknath shinde and ladki bahin yojana
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2026 | 2:57 PM

Ladki Bahin Yojana : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथील कार्यक्रमांा हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे राज्य, त्यांचे लोककल्याणकारी धोरण याचा उल्लेख केला तसेच काहीही झालं तरी चौंडीचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. या ठिकाणाचा विकार होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच आपल्या भाषणात ते लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख करायला विसरले नाहीत. आपल्या भाषणात त्यांनी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे.

आम्ही जिल्ह्याचे नामांतर केले

सभेत बोलताना, राजे झाले आणि राज्यकर्ते झाले पण जनतेच्या मनावर आई म्हणून राज्य करणाऱ्या फार कमी व्यक्ती होत्या. त्यामध्ये आपल्या अहिल्यादेवी होत्या. ३०० वर्षांनंतर देखील देश अहिल्यादेवींचे कृतज्ञपणे स्मरण करतोय. अहिल्यादेवी यांनी आदर्श राज्यकारभार कसा असतो हे दाखवले. आम्ही अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर केले. या जिल्ह्याला आम्ही अहिल्यादेवी यांचे नाव दिले. अहिल्यानगर असे नामकरण केले, अशी आठवण शिंदे यांनी करून दिली. तसेच चर्चा ना करता आम्ही ऑन दा स्पॉट डिसिजन घेत असतो, असेही शिंदे म्हणाले.

मी पुन्हा सांगतो की….

आम्ही चोंडी येथे आम्ही मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि मोठे निर्णय घेतले. आम्ही जे बोलतो ते करतो. चौंडी येथील विकासाचं वातावरण आपल्याला बदलायचं आहे. येथे येणारा प्रत्येक माणूस नतमस्तक होतो. एवढं हे पवित्र स्थान आहे. मुख्यमंत्री सकाळी येऊन दर्शन घेऊन गेले. मी पुन्हा एकदा सांगतो की जे जे आवश्यक आहे त्यासाठी इंचभरही त्रुटी राहू देणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

लाडकी बहीण योजनेविषयी काय म्हणाले?

तसेच, या विकासकामांसाठी पैसे कमी पडू देणार नाही. चौंडीच्या विकासासाठी ज्या-ज्या मागण्या केलेल्या आहेत, त्या माझ्या लक्षात आहेत. मुंबई-पुणे रस्ता असेल, शिंग्रोबाच्या बाबतीत केलेल्या मागण्या माझ्या लक्षात आहेत. समाजासाठी जे काही करता येईल, ते केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा विश्वा स यावेळी शिंदे यांनी दिला. पुढे बोलताना लाडकी बहीण योजनेचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. लाडकी बहीण योजना भविष्यातही चालूच राहणार आहे. कोणीही ही योजना बंद करू शकणार नाही, असे ते म्हणाले.

Follow Us