गडचिरोलीत हत्ती गाळात रुतला, तडफडून थकला, 20 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू

कमलापूर हत्तीकॅम्पमध्ये एका चार वर्षांच्या हत्तीच्या पिल्लाच्या मृत्यूनंतर वनविभागात एकच खळबळ उडाली आहे (Death of Aditya Hatti in Kamalapur Elephant Camp Gadchiroli).

गडचिरोलीत हत्ती गाळात रुतला, तडफडून थकला, 20 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू

गडचिरोली : कमलापूर हत्तीकॅम्पमध्ये एका चार वर्षांच्या हत्तीच्या पिल्लाच्या मृत्यूनंतर वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. या पिल्लाचं नाव आदित्य असं होतं. तो 20 दिवसांपूर्वी रात्री भर पावसात चिखलात अडकला होता. त्याला चिखलातून बाहेर पडता आलं नाही. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला चिखलातून बाहेर काढण्यात आलं. तेव्हापासून तो आजारी पडला होता. त्याच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरु होते. मात्र, काल (29 जून) सकाळी त्याचा मृत्यू झाला (Death of Aditya Hatti in Kamalapur Elephant Camp Gadchiroli).

आदित्य 10 जून रोजी मुसळधार पावसात चिखलात अडकला होता. त्याने बाहेर पडण्याचा बरात प्रयत्न केला. मात्र, त्याला बाहेर पडता आलं नाही. शेवटी तो थकला. त्यामुळे त्याला संपूर्ण रात्र तिथेच काढावी लागली. विशेष म्हणजे त्यावेळी कॅम्पमध्ये वन विभागाचे कर्मचारी नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने हत्ती चिखलात अडकल्याची माहिती गावात दिली. त्यानंतर सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास त्याला चिखलातून बाहेर काढण्यात आलं (Death of Aditya Hatti in Kamalapur Elephant Camp Gadchiroli).

हेही वाचा : दारु न मिळाल्याने सॅनिटायजर प्यायला, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

रात्रभर पावसात भिजल्यामुळे तो आजारी पडला होता. त्याने खाणंपिणंही सोडलं होतं. गेल्या 20 दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुर होता. दरम्यान, वनविभागाने तज्ज्ञ पशुवैदयकीय अधिकाऱ्यांना पाचारण करुन योग्य उपचार केले असते तर असा प्रकार घडला नसता, अशी चर्चा सध्या कमलापूर गावात सुरु आहे.

कमलापूर येथील शासकीय हत्तीकॅम्प हे महाराष्ट्रातील एकमेव हत्तीकॅम्प आहे. या ठिकाणी पर्यटनाला वाव आहे. मात्र, 10 हत्तींची देखरेख करण्यासाठी योग्य मनुष्यबळ नाही. मागील अनेक वर्षांपासून रिक्तपदे भरण्याची मागणी होत असूनही वनविभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. योग्य मनुष्यबळ असतं तर आज ही घटना घडली नसती. आदित्य नावाच्या हत्तीचा मृत्यू कशामुळे झाला? याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असं कमलापूर गावाचे सरपंच रजनीता मडावी म्हणाले.

कमलापूर हत्तीकॅम्पमध्ये एकूण 10 हत्ती आहेत. या हत्तींच्या देखरेखेसाठी 4 नियमित कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहेत. याशिवाय 7 रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे एकूण 11 कर्मचारी हत्तींची देखभाल करतात. मात्र, त्यांना प्रशिक्षण योग्य प्रशिक्षण नसल्यामुळे हत्ती हाताळण्यात अडचणी येतात. याशिवाय हत्तीकॅम्पमधील मनुष्यबळदेखील कमी आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *