AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय, यापुढे…

Pune Deenanath Mangeshkar Hospital : . भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. त्याच मुद्यावरून मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन अडचणीत सापडलं असून त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला

Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय, यापुढे...
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णयImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 05, 2025 | 1:14 PM
Share

पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर झालेल्या गंभीर आरोपानंतर हे हॉस्पिटल सध्या बरंच चर्चेत आलं आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. त्याच मुद्यावरून मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन अडचणीत सापडलं असून त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम ( डिपॉझिट) घेतली जाणार नाही’ , असा ठराव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत झाला आहे.

दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला होता. आमदार गोरखे यांचे पीए असलेले संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. या प्रकरणात आमदार अमित गोरखे यांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले होते.   दिनानाथ रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी  10 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप देखील गोरखे यांनी केला. यामुळे प्रचंड खळबळ  माजली आणि रुग्णालयावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली. बघता बघता हे प्रकरण खूपच तापलं.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात समितीची घोषणा केली. पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आलं. या प्रकरणात रुग्णालयाच्या चौकशीचा अहवाल समोर आला, त्यामध्ये अनेक खुलासे झाले.

रुग्णालयाकडून मोठा निर्णय

मात्र तरीही रुग्णालय प्रशासनावर बरीच टीका होत असून त्याच पार्श्वभूमीवर आता रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत एक ठराव झाला आहे. त्यानुसार यापुढे इमर्जन्सी असेल किंवा प्रसूतीसाठी असेल, कोणताही रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला, तर यापुढे त्या रुग्णाकडून  कोणतीही अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट घेतलं जाणार नाही, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. थोड्या वेळापूर्वीच हा निर्णय रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

आजपासूनच होणार अंमलबजावणी

जेव्हा दीनानाथ सुरू झालं तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट घेतलं जात नसे, पण जसजसे उपचार आणि शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले तसतसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास डिपॉझिट घेण्यास कुठेतरी सुरूवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंटकडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो वा डिलीव्हरीच्या डिपार्टमेंटला आला असेल वा लहान मुलांच्या विभागात असेल त्यांच्याकडून इमर्जन्सी अनात रक्कम ( डिपॉझिट) घेणार नाही, असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असे रुग्णालयातर्फे जाहीर करण्यात आलं आहे.

 

Follow Us
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...