उद्धव ठाकरे यांना संदर्भ देऊन दीपक केसरकर यांनी डिवचलं, 2018 मध्ये उद्धव ठाकरे काय केलं होतं?

बाळासाहेबांचा विचार आणि हिंदुत्वाचा विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत म्हणून आम्हाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याचे दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांना संदर्भ देऊन दीपक केसरकर यांनी डिवचलं, 2018 मध्ये उद्धव ठाकरे काय केलं होतं?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 7:49 AM

भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Central Election Commission ) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिले आहे. खरंतर हा निर्णय उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाला मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन या निर्णयावर बोलत असतांना लोकशाहीची हत्या झाल्याचे म्हंटले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी हल्लाबोल केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनीच कशी लोकशाहीची हत्या केली होती याबाबत दावा केला आहे.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे आम्हाला मिळाले म्हणजे सत्याचा विजय झाला आहे. बाळासाहेबांचा विचार आणि हिंदुत्वाचा विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत म्हणून आम्हाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याचे दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून 2018 मध्येच लोकशाहीची विटंबना झाली होती असा आरोपही दीपक केसरकर यांनी केला आहे. शिवसेनेच्या घटनेत दुरुस्ती करून नियुक्तींचे अधिकार एकट्याकडे घेतले होते असेही केसर यांनी म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

नियुक्तीचे अधिकार एकट्याकडे घेणाऱ्यांनी लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळा काढू नये अशी घणाघाती टीकाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

2018 ची घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली जाईल तेव्हाच ते उघडे पडतील असा दावा दीपक केसरकर यांनी करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आज खऱ्या अर्थाने झाला आहे. आमची बाजू सत्याची होती त्यामुळे आमचा विजय झाला आहे असेही दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांना मूळ विचारधारेसोबतच जायचे होते. ते तयारही झाले होते पण त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव होता. पण लोकशाहीचे धिंडवडे निघाले असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना नैतिक बळ आहे का ? असाही सवाल केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

शुक्रवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत करत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत 2018 मध्येच उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीची विटंबना केली असल्याचे म्हंटले आहे.

Non Stop LIVE Update
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....