
Delhi Election Results 2025 : राजधानी नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला आहे. तब्बल २७ वर्षांनी भाजपने दिल्लीत कमबॅक केले. तर आपला पराभवाचा झटका बसला. नवी दिल्लीत भाजपने तब्बल ४८ जागांवर मुसंडी मारली. तर आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत आपचा पराभव होणार असल्याचे निश्चित होताच आता महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तसेच भाजपचेही अभिनंदन केले आहे. “खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
यह मोदीजी की गॅरंटी का कमाल है | महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे असलेलं ‘आप’चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही ‘आपदा’ टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलं आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद!
घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
यह मोदीजी की गॅरंटी का कमाल है |
महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान माननीय @narendramodi जी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 8, 2025
दरम्यान नवी दिल्लीत ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडले. आज दिल्लीत मतमोजणी पार पडली. या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलापासूनच भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. तर आप पोस्टल तसेच ईव्हीएम मतमोजणीतही पिछाडीवर पाहायला मिळाली. दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. यात भाजपला ४८ जागांवर विजय मिळाला आहे. तर आपला २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी भाजपला संधी देत ‘आप’ला नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.