Local Train Fire | महाराष्ट्रात लोकल ट्रेनला मोठी आग, पाहा कुठे घडली घटना

मध्य रेल्वेच्या नारायण डोह ते नगर सेक्शनमध्ये नगर ते आष्टी ट्रेन क्र. 01402 या डेमू लोकल ट्रेनला सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. सुदैवाने या आगीत कोणी जखमी झाले नाही.

Local Train Fire | महाराष्ट्रात लोकल ट्रेनला मोठी आग, पाहा कुठे घडली घटना
nagar ashti fire
Image Credit source: socialmedia
| Updated on: Oct 16, 2023 | 6:15 PM

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : नगर आष्टी मार्गावरील डेमू लोकल ट्रेनला वाळूंज ( ता.नगर ) येथे सोमवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गाडीचे पाच डबे जळून खाक झाले. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेनंतर घटनास्थळी अग्मिशमन दलाचे बंब दाखल झाले आणि त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग लागल्याचे वेळीच कळाल्याने प्रवाशांना ट्रेनमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आल्याने सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

नारायण डोह ते नगर सेक्शनमध्ये नगर ते आष्टी ट्रेन क्र. 01402 या डेमू लोकल ट्रेनला सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. ट्रेनच्या गार्ड साईडच्या ब्रेक व्हॅन आणि चार डब्यांना ही आग लागली आणि पसरत गेली. या आग लागल्याचे सुदैवाने वेळीच निर्दशनात आल्याने प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणालाही काही दुखापत झाली नाही. आगीवर अग्निशमन दलाच्या पथकाने त्वरीत नियंत्रण मिळविले असले तरी या आगीत रेल्वेचे प्रचंड नुकसान झाले आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

नगर ते आष्टी मार्गावर नुकतेच डेमू लोकल ट्रेनचा प्रवास सुरु झाला आहे. या ट्रेनला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे समजू शकलेले नाही. त्यामुळे मध्य रेल्वेने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. दुपारी तीनच्या सुमारास ही आग लागल्याचे समजले. त्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग तातडीने पसरल्याने पाच डबे जळून खाक झाले आहेत. त्यामुळे रेल्वेला मोठे नुकसान झाले आहे.