AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदेंचे थेट आदेश..

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली. त्यांनी सोमवारी मातोश्रीवर येतो, असा निरोप दिला आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यादरम्यानच आता एकनाथ शिंदे यांनी मोठा आदेश दिला.

ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदेंचे थेट आदेश..
Eknath Shinde and Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 23, 2026 | 12:59 PM
Share

शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटात काल या खासदारांनी एकत्र प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्रही दिले. 6 खासदार एकाच वेळी शिवसेना शिंदे गटातून गेल्याने मोठे खिंडार ठाकरे गटाला पडले. व्हिप जारी करूनही पक्षाच्या बैठकीला 6 खासदार हजर झाले नसल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाकडून हा 6 खासदारांवर कारवाई केली जाणार आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेत थेट या 6 खासदारांच्या मतदार संघात दाैरा करण्याचा निर्णय घेतला. मोठे बदल या मतदार संघात होणार असल्याचे स्पष्ट आहे. दोन्ही पक्षांकडून काही मोठे निर्णय घेतले जात आहेत. ओमराजे निंबाळकरही शिवसेना शिंदे गट धाराशिवमध्ये मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. त्यांनी थेट मोठे आदेश दिली आहेत. शिवसेनेची धाराशिवची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. आता नवीन पुनर्बांधणी पक्षाकडून केली जाईल. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत होणार खांदेपालट.

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली. लवकरच पक्ष पुनर्बांधणी करून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला.

ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्याची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. यादरम्यान त्यांनी मोठा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर कोणत्याही प्रकारची टीका करणार नसल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. पण संजय राऊत यांच्यावर ओमराजे निंबाळकर यांच्यावर सतत टीका केली जात आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाने शिवसेना शिंदे गटाला मोठी ताकद धाराशिव जिल्ह्यात मिळाली.

Follow Us
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर