मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, थेट एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या 6 खासदारांसोबत तब्बल 30 मिनिटे..
Shivsena Operation Tiger : शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. यादरम्यानच आता घडामोडींना वेग आला. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी जवळपास 30 मिनिटे ठाकरेंच्या खासदारांसोबत संवाद साधला आहे. यादरम्यान त्यांनी मोठे आश्वासन या खासदारांना दिले.

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यांच्या पक्षाच्या 6 खासदारांनी बंडखोरी करत थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले. ज्याने एकच खळबळ उडाली. शिवसेना ठाकरे गटाकडून आपल्या खासदारांना तात्काळ व्हिप बजावण्यात आले. आज दिल्लीत त्यांच्या दलाची बैठक आहे. या बैठकीला हे खासदार उपस्थित राहण्याची कुठे ना कुठे शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षा आहे. आज बैठकीला हे खासदार दाखल झाले नाही की, स्पष्ट होईल की, हे 6 खासदार बंडखोरीवर कायम आहे. या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने जॉईन होता येणार नाही. प्रत्यक्षातच सहभागी राहवे लागणार आहे. संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे दिल्लीत आहेत. जे खासदार या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई पक्षाकडून केली जाईल.
यासोबतच शिवसेनेकडून दावा केला जात आहे की, ऑपरेशन टायगर शिंदेचे फेल गेले. विविध संभ्रम निर्माण झाली आहेत. हे खासदार शिवेसना शिंदे गटात 19 जूनला प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता तारीख पुढे ढकलण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून सांगितले जातंय की, ऑपरेशन टायगर यशस्वी झाले फक्त घोषणा करणे शिल्लक आहेत.
या 6 खासदारांना सुरक्षेच्या कारणामुळे अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. यादरम्यानच आता मोठी माहिती पुढे येत आहे. शिवसेनेच्या सर्व 6 खासदारांचा रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्यासोबत काॅन काॅलवर बोलणं झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळतंय. सर्व 6 खासदारांसोबत 30 मिनिटं सविस्तर चर्चा झाली. ऑपरेशन टायगर यशस्वीरित्या पार पडलंय, शिवसेना सर्व खासदारांच्या पाठिशी खंबीर ऊभी राहणार असल्याचे मोठे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी खासदारांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यामुळे ठाकरेंचे 6 खासदार आज संसदीय बोर्डाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची शिवसेना शिंदे गटाच्या सूत्रांची माहिती आहे. हा खरोखरच उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का म्हणावा लागेल. हे सर्व ऑपरेशन गोपनिय पद्धतीने राबवण्याची दिल्लीत श्रीकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी आहे. ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी श्रीकांत शिंदे दिल्लीत ठाण मांडून असल्याचीही माहिती सूत्रांनी दिलीये.