AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहिणींनो… अजित पवार यांचं आवाहन काय?; अर्थसंकल्पाचा का दिला संदर्भ?

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेबाबत अलीकडेच निर्माण झालेल्या शंकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की ही योजना बंद होणार नाही. मात्र, फक्त पात्र लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळेल, असेही ते म्हणाले.

लाडक्या बहिणींनो... अजित पवार यांचं आवाहन काय?; अर्थसंकल्पाचा का दिला संदर्भ?
ajit pawar
| Updated on: Feb 18, 2025 | 7:44 PM
Share

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत सुपरहिट ठरली. लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या खात्यावर दर महिना १५०० रुपये रक्कम जमा करण्यात आली. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर जर सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेच्या हफ्ता २१०० रुपये करु असे आश्वासन दिले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार लाडक्या बहि‍णींना दिलेली रक्कम परत घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याने ही योजना बंद केली जाईल, अशी चर्चाही पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या याजनेतील लाभार्थी महिलांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजना, अर्थसंकल्प यांसह विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाष्य केले. माझ्यासाठी मंगळवारचा दिवस हा महत्त्वाचा असतो. कॅबिनेट, प्री कॅबिनेट असते. आता अर्थसंकल्प सादर करायचा आहे. उद्या शिवजयंती आहे. त्यामुळे उद्या कार्यक्रम घेतोय. उद्या शिवनेरीला मी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे सकाळी 7 ला जाणार आहोत आणि नतमस्तक होणार आहोत. आमचा शिवस्वराज्य सप्ताह आहे, असे अजित पवार म्हणाले.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

“मला या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने राज्याला आर्थिक शिस्त लावायची आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मात्र जे पात्र आहेत त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा”, असे आवाहन अजित पवारांनी केले.

“यापुढेही जे जे सहकारी दुर्लक्षित आहेत, त्यांना आपल्यासोबत घ्यावं. पुढे मी नांदेड, परभणीला जाणार आहे. तिथेही पक्षप्रवेश आहेत. हवशे नवशे गवशे सगळे येतात आणि म्हणतात की मला महामंडळ द्या, मला DPDC च हे द्या, पण आपण काय केलं याचा वापर करा. स्वराज्य सप्ताहच्या निमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत”, असेही अजित पवारांनी म्हटले.

महिलांकडून रिकव्हरी करण्याचा अजिबात विचार नाही

दरम्यान याआधीही अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी कबुली दिली होती. “लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा आमच्याकडे मर्यादित वेळ होता. त्यामुळे आम्हाला बहि‍णींचे आधार कार्ड लिंक करता आले नाहीत. पण आता आम्ही खरोखर ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना याचा लाभ मिळणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलत आहोत”, असे अजित पवार म्हणाले. “पण या योजनेतील महिलांकडून रिकव्हरी करण्याचा अजिबात विचार नाही”, असेही अजित पवारांनी म्हटले होते.

Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत