AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे म्हणाले, काल इथं कुणी तरी गाजर दाखवून गेलं, आता फडणवीसांचं थेट उत्तर

दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीची आदित्य यांची ही प्रचारसभा आणखी एका कारणामुळे विशेष ठरली. याआधी 1999 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रचारसभा झाली होती, जी महाराष्ट्राबाहेर झालेली बाळासाहेबांची एकमेव सभा होती. त्यानंतर जवळपास 22 वर्षांनी बाळासाहेबांचा नातू असलेल्या आदित्य यांनी दादरा नगर-हवेलीमध्ये प्रचारसभा घेतली.

आदित्य ठाकरे म्हणाले, काल इथं कुणी तरी गाजर दाखवून गेलं, आता फडणवीसांचं थेट उत्तर
Devendra Fadanvis
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Oct 27, 2021 | 4:48 PM
Share

दादरा नगर-हवेली: शिवसेना आणि भाजप यांच्यात दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे जोरदार रंगत पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं होतं, त्यालाच आता देवेंद्र फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. आदित्यच्या टीकेवर बोलत नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या विषयावर बोलण्याचं टाळलंय.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

काल इथे महाराष्ट्रातून कोणी येऊन गेले. त्यांनी गाजर वाटप केले असेल. ते महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी इथे एवढे कोटी दिले, तितके कोटी दिले, असे सांगत फिरत असल्याचा टोला आदित्य यांनी लगावला होता. आम्ही इथे पक्ष वाढवण्यासाठी आलो नाही, आम्ही गोव्यात गेलो, राजस्थानमध्ये गेलो, परंतु ही लढाई न्याय हक्कासाठी आहे. डेलकर कुटुंब असेल, दादरा, नगर-हवेली असेल यांच्यासाठी आहे. दोन परिवार एकत्र आल्यानंतर जो उत्साह आहे तो मी पाहिला आहे. डेलकर कुटुंबाचे मी इथे काम पाहिले, योगदान पाहिले. आजचा जनतेचा प्रतिसाद पाहण्यासारखा होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.

22 वर्षांनंतर ठाकरेंचं पुन्हा ‘सीमोल्लंघन’

दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीची आदित्य यांची ही प्रचारसभा आणखी एका कारणामुळे विशेष ठरली. याआधी 1999 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रचारसभा झाली होती, जी महाराष्ट्राबाहेर झालेली बाळासाहेबांची एकमेव सभा होती. त्यानंतर जवळपास 22 वर्षांनी बाळासाहेबांचा नातू असलेल्या आदित्य यांनी दादरा नगर-हवेलीमध्ये प्रचारसभा घेतली.

फडणवीसांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी सिल्वासात प्रचारासाठी आले होते. यावेळी शिवसेनेला लक्ष्य केले होते. शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केलाय. ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांचं करतील, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. संबंधित बातम्या

फक्त झोपा, नेटफ्लिक्स पाहा आणि 25 लाख मिळवा, ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर

EPFO Alert: …तर पीएफमध्ये आलेले व्याजाचे पैसे गायब होणार, चुकूनही हा नंबर शेअर करू नका

devendra fadnavis criticism on aditya thackeray Due to byelection of Dadra Nagar-Haveli Lok Sabha constituency

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी